श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने केले फोटोशूट; पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 14:07 IST2017-02-26T08:37:25+5:302017-02-26T14:07:25+5:30

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या बोल्डनेसचे चर्चे नेहमीच रंगले आहेत. आता तिच्या पावलावर पाऊल तिची मोठी मुलगी पलक तिवारी ...

Shweta Tiwari's daughter Palak Tiwari made photoshoot; View Photos | श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने केले फोटोशूट; पहा फोटो

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने केले फोटोशूट; पहा फोटो

व्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या बोल्डनेसचे चर्चे नेहमीच रंगले आहेत. आता तिच्या पावलावर पाऊल तिची मोठी मुलगी पलक तिवारी टाकताना दिसत आहे. नुकतेच तिने फोटोशूट केले असून, त्यातील काही फोटोज् इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. यामध्ये पलक खूप सुंदर दिसत असून, जणू काही आईप्रमाणेच तीही छोट्या पडद्यावर नशीब आजमावण्यास उत्सुक असल्याचेच दिसून येत आहे. 



श्वेता तिवारी हिने नुकतेच एका मुलाला जन्म दिला असून, सध्या ती त्याच्यासोबतचे सुंदर क्षण एन्जॉय करीत आहे. परंतु श्वेताची मुलगी आता आईचा वारसा चालविण्यास सज्ज झाली आहे. ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या श्वेताप्रमाणेच पलकही अशाच एका संधीच्या शोधात आहे. त्यासाठी तिचा आटापिटा सुरू असून, फोटोशूटमधून तिने टीव्ही डेब्यू करण्यास सज्ज असल्याचेच एकप्रकारे दाखवून दिले आहे. 



श्वेताने नुकतेच तिचा मुलगा रेयांशचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पलकनेही आपल्या लहान भावासोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते. त्याचबरोबर एक व्हिडीओही शेअर केला होता. यामध्ये रेयांश खूपच क्यूट दिसत होता. बºयाचशा युजर्सनी या व्हिडीओला लाइक केले होते. त्याचबरोबर रेयांश हा बहीण पलकसारखाच दिसत असल्याच्या कमेण्टही दिल्या होत्या. 



आता पलकनेही तिचे काही फोटो अपलोड केल्याने ती चर्चेत आली आहे. फोटोमध्ये पलक खूपच सुंदर दिसत असून, तिचा लूक बघण्यासारखा आहे. वेगवेगळ्या अ‍ॅँगलने केलेल्या या फोटोशूटमध्ये पलकच्या अदा काहीशा आई श्वेतासारख्याच आहेत. आताही तिची टीव्हीत येण्याची तयारीत नसावी ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र पलकच्या टीव्ही डेब्यूबाबत अद्यापपर्यंत कुठलाही खुलासा केला गेला नसल्याने तिच्या फॅन्ससाठी मात्र हे कोडे निर्माण झाले आहे. 



पलक श्वेताचा पहिला पती राजा चौधरी याची मुलगी आहे. दोघांमध्ये २००७ साली घटस्फोट झाला होता. त्यानंतर श्वेताने दुसरा विवाह केला. मात्र पलक आई श्वेताबरोबर राहात असून, तिच्या पावलावर पाऊल ठेवण्याची कुठलीच कसर सोडत नसल्याचेच दिसून येत आहे. 







 

Web Title: Shweta Tiwari's daughter Palak Tiwari made photoshoot; View Photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.