लेक पलकला कुपोषित आणि सुकडी म्हणणाऱ्यांची अभिनेत्री श्वेता तिवारीने अशी केली बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 12:50 IST2022-03-10T12:37:58+5:302022-03-10T12:50:38+5:30
23 वर्षांच्या कारकिर्दीत श्वेता तिवारीला अनेकवेळा लोकांच्या टोमणेही ऐकावे लागले.

लेक पलकला कुपोषित आणि सुकडी म्हणणाऱ्यांची अभिनेत्री श्वेता तिवारीने अशी केली बोलती बंद
श्वेता तिवारी (Shweta Tiwari) दोन दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत आहे. 23 वर्षांच्या कारकिर्दीत श्वेता तिवारीला अनेकवेळा लोकांच्या टोमणेही ऐकावे लागले. एक वेळ अशी आली जेव्हा श्वेता तिवारीने अशा लोकांपासून स्वतःला दूर केले. पण जेव्हा मुलगी पलक तिवारी(Palak Tiwari) चा प्रश्न आला तेव्हा श्वेता तिवारी गप्प बसणारी नव्हती. श्वेता तिवारीची मुलगी पलक बारीक असल्याने अनेकवेळा तिला ट्रोल केलं जातं, तिची खिल्ली उडवली जाते. अशा लोकांना श्वेताने सडेतोड उत्तर दिलं आहे.
पलकला सोशल मीडियावर ट्रोल केले जात असून लोक तिला कुपोषित म्हणता येत. याबाबत नुकतीच पलकची आई श्वेताने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, लोक अजूनही म्हणतात, ही किती बारीक आहे पण मी त्यावर काही बोलत नाही. तू अशीच सुंदर दिसतेस. तुम्ही निरोगी आहात, धावू शकता तर काहीच अडचण नाही. जोवर पलकही निरोगी आहे, तिची तब्येत व्यवस्थित आहे तोवर मला पर्वा नाही तिची शरीरयष्टी कशी आहे याची. आजकाल इंस्टाग्राम लोकांना ट्रोल करण्यासाठी पुरेसे आहे. लोक तिला 'कुपोषित', 'सुकडी' म्हणतात आणि माहिती नाही अजून काय काय म्हणतात, पण मला त्याची पर्वा नाही.'
पलकने मागच्या वर्षी हार्डी संधूच्या म्युझिक व्हिडिओ बिजली बिजलीमधून पदार्पण केले होते. ती लवकरच विशाल मिश्राच्या रोझी: द सॅफरॉन चॅप्टरमध्ये दिसणार आहे ज्यात विवेक ओबेरॉय देखील आहे. पलक आता २१ वर्षांची आहे.