​श्वेता तिवारीला झाले पुत्ररत्न प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 18:29 IST2016-12-02T18:06:49+5:302016-12-02T18:29:52+5:30

टीव्ही मालिका ‘कसोटी जिंदगी की’ मधून घराघरात पोहचलेली प्रसिद्ध टीव्ही स्टार श्वेता तिवारी पुन्हा एकदा आई झाली आहे. तिला ...

Shweta Tiwari got a son-in-law | ​श्वेता तिवारीला झाले पुत्ररत्न प्राप्त

​श्वेता तिवारीला झाले पुत्ररत्न प्राप्त

ong>टीव्ही मालिका ‘कसोटी जिंदगी की’ मधून घराघरात पोहचलेली प्रसिद्ध टीव्ही स्टार श्वेता तिवारी पुन्हा एकदा आई झाली आहे. तिला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. 

मुंबई सांताक्रुझ येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये आज तिने आपल्या बाळाला जन्म दिला. श्वेता व तिच्या बाळाची प्रकृती स्थिर असून दोघेचे आरोग्य चांगले असल्याचे सूर्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. 2013 साली अभिनव कोहलीसोबत तिने विवाह केला होता. या दोघांचे हे पहिले बाळ आहे. तर श्वेताचे हे दुसरे अपत्य आहे. 2001 साली श्वेताना पलक या मुलीला जन्म दिला होता. 

श्वेता तिवारी हिने वयाच्या 19व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 2001 साली कहानी किसी रोज या मालिकेत झळकली होती. या पश्चात तिने अनेक मालिकांत काम केले. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती ‘कसोटी जिंदगी की’ या मलिकेतून. बिग बॉस या प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शोच्या चौथ्या भागाची श्वेता तिवारी विजेती ठरली होती. 

1998 साली श्वेताने भोजपुरी सिने कलावंत राजा चौधरीशी लग्न केले. 2007 साली दोघांनी घटस्फोट घेतला. 2013 साली अभिनव कोहलीशी लग्न होण्यापूर्वी ती सिंगल मदर म्हणून आपल्या मुलीचा सांभाळ करीत होती. 

सूर्य हॉस्पिटलच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. शोभा वर्मा यांनी बाळाची प्रकृती स्थिर असून त्याचे सर्व अंग चांगल्या प्रकारे काम करीत आहेत व बाळ निरोगी असल्याचे सांगितले. श्वेताने सूर्य हॉस्पिटलची प्रशंसा करीत बाळाच्या जन्माने आनंदी असल्याचे सांगितले. 

श्वेताने हिंदी, मराठी, पंजाबी, कनाडा, नेपाळी व उर्दू चित्रपटात काम केले आहे. टीव्ही मालिका व रिआॅलिटी शोमधून श्वेताला खरी ओळख मिळाली. 

Web Title: Shweta Tiwari got a son-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.