दोन वेळा लग्न केले म्हणून मुलगीही करणार ५ वेळा लग्न, श्वेता तिवारीची लोकं उडवतात खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 13:31 IST2021-03-31T13:28:06+5:302021-03-31T13:31:37+5:30
Shweta tiwari reacts on peoples comment related to her married life.लोक माझ्याकडे येतात आणि मला सांगतात की तिसऱ्यांदा लग्न करू नको. मी त्यांना विचारले का? तो कोण आहे? ते लग्नासाठी पैसे खर्च करतायेत का? हे माझे जीवन आहे, माझा निर्णय आहे '.

दोन वेळा लग्न केले म्हणून मुलगीही करणार ५ वेळा लग्न, श्वेता तिवारीची लोकं उडवतात खिल्ली
दोनवेळा लग्नात अपयशी ठरल्यामुळे तिसऱ्यांदा लग्न न करण्याचा श्वेता तिवारीला लोक सल्ला देतात. खुद्द श्वेताने दिलेल्या मुलखतीमध्ये सांगितले की, मुलगी पलकवर उलटसुलट चर्चा करतात. पलकही ५ वेळा लग्न करणार असे सांगत अनेकदा खिल्ली उडवतात.
लोक 10 वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहूनसुद्धा वेगळे होतात .त्यांना कोणी विचारत नाही.मात्र लग्न केलेल्या महिलेने लग्न तोडले तर त्यावर लगेच तिच्यावर टीका केली जाते.
लोक माझ्याकडे येतात आणि मला सांगतात की तिसऱ्यांदा लग्न करू नको. मी त्यांना विचारले का? तो कोण आहे? ते लग्नासाठी पैसे खर्च करतायेत का? हे माझे जीवन आहे, माझा निर्णय आहे '.
मला आता अशा ट्रोलिंगचा तसाही फारसा फरक पडत नाही. अशा लोकांना तर मी बोलेन, त्यांनी माझ्या आयुष्यात काय सुरुय यावर जास्त लक्ष ना देता स्वतःच्या आयुष्यावर जास्त लक्ष द्यावे. माझ्या मुलीच्या आयुष्याचा विचार करण्यासाठी मी आहे. लग्नानंतर माझ्या आयुष्यात माझ्या बरोबर जे काही घडले ते पाहून पलक कधीच लग्नाचा विचारही करणार नाही.एक चांगली व्यक्ती पाहूनच ती लग्न करेन.