​श्वेता साळवेने पुन्हा एकदा केले बिकनीत फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 12:00 IST2017-03-02T06:30:30+5:302017-03-02T12:00:30+5:30

श्वेता साळवेने हिप हिप हुर्रे, लेफ्ट राइट लेफ्ट यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच झलक दिखला जा कार्यक्रमात तिने ...

Shweta Salve again made bikinit photoshoot | ​श्वेता साळवेने पुन्हा एकदा केले बिकनीत फोटोशूट

​श्वेता साळवेने पुन्हा एकदा केले बिकनीत फोटोशूट

वेता साळवेने हिप हिप हुर्रे, लेफ्ट राइट लेफ्ट यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच झलक दिखला जा कार्यक्रमात तिने तिचे नृत्य कौशल्य दाखवले होते. लग्न झाल्यानंतर श्वेता काहीशी अभिनयापासून दूर गेली. गेल्या काही महिन्यात श्वेता कोणत्याच मालिकेत झळकलेली नाही. श्वेता छोट्या पडद्यापासून दूर असली तरी मीडियामध्ये चांगलीच चर्चेत असते. तिने हरमित सेठी या तिच्या प्रियकरासोबत 2012मध्ये लग्न केले होते. हरमित आणि तिला एक सहा महिन्यांची मुलगीदेखील आहे.
श्वेताने तिच्या गरोदरपणात बिकनी घालून फोटोशूट केले होते. तसेच मुलगी झाल्यानंतरही तिने बिकनीत फोटोशूट केले होते. हे फोटोशूट सोशल मीडियात प्रचंड गाजले होते. तिने ऑगस्टमध्ये मुलीला जन्म दिल्यानंतर आता केवळ सहाच महिन्यात तिचे वजन प्रचंड कमी केले आहे. तिने बिकनीतील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोत ती खूप सेक्सी दिसत आहे. तिने योगा आणि व्यायाम करून तिचे गरोदरपणात वाढलेले सगळे वजन कमी केले आहे. 

shweta salve baby

श्वेता सध्या गोव्यात असून तिने बिकनीमधला फोटो पोस्ट केला आहे आणि सहा महिन्यातच माझे पोट खूप कमी झाले आहे असे वाटत नाही का? असे कॅप्शन लिहिले आहे.
श्वेता आणि हरमितने त्यांच्या मुलीचे नाव आर्या असे ठेवले असून श्वेता नेहमीच तिच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. हरमितने बर्गर फॅक्टरी नावाचे रेस्टॉरंट गोव्यात सुरू केले असून या रेस्टॉरंटच्या इंटेरिअरमध्ये स्वतः श्वेता लक्ष देत आहे. तिने काही दिवसांपूर्वी रेस्टॉरंटचे काम सुरू असतानाचे फोटोदेखील इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. 



Web Title: Shweta Salve again made bikinit photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.