तात्याविंचू बनून रस्त्यावर फिरतेय अभिनेत्री, स्वत:च बनवला कॉस्ट्यूम, पाहून लोक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:04 IST2025-10-30T14:03:56+5:302025-10-30T14:04:22+5:30
टीव्ही अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत अभिनेत्री तात्याविंचू बनून रस्त्यावर फिरताना दिसत आहे.

तात्याविंचू बनून रस्त्यावर फिरतेय अभिनेत्री, स्वत:च बनवला कॉस्ट्यूम, पाहून लोक म्हणाले...
टीव्ही अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत अभिनेत्री तात्याविंचू बनून रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तिला पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्रीने स्वत:च्या हाताने तात्याविंचूचा हा कॉस्ट्यूम शिवला आहे. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
अभिनेत्री श्वेता महाडिक अभिनयासोबतच तिच्या क्रिएटिव्हिटीसाठी ओळखली जाते. श्वेता एक कंटेट क्रिएटरदेखील आहे. टाकाऊ वस्तूंना खास टच देऊन त्यातून ती टिकाऊ वस्तू बनवते. अनेक ड्रेसही ती रिक्रिएट करते. आता श्वेताने हॅलोवनसाठी खास तात्याविंचूचा कॉस्ट्यूम शिवला आहे. हॅलोवन पार्टीला अॅनाबेला, चकी, नन या हॉलिवूड हॉरर कॅरेक्टरचा लूक केला जातो. पण श्वेताने देसी हॉरर असलेल्या तात्याविंचूचा लूक करायचं ठरवलं.
यासाठी श्वेताने घरच्या घरीच तात्याविंचूचा कॉस्ट्युमही तयार केला. स्वत:च्या हाताने तिने हा कॉस्ट्युम शिवला आहे. याचा व्हिडीओ श्वेताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओत श्वेता तात्याविंचूचा कॉस्ट्यूम घालून रस्त्यावर आणि मॉलमध्ये फिरताना दिसत आहे. तिला पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाल्याचं दिसत आहे.