चंद्र-नंदिनी या मालिकेसाठी श्वेता बासू प्रसाद शिकतेय नवीन भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 10:50 IST2017-02-02T05:20:04+5:302017-02-02T10:50:04+5:30

चंद्र-नंदिनी ही मालिका प्रेक्षकांचे सध्य़ा चांगलेच मनोरंजन करत आहे. श्वेता बासू प्रसादने कहानी घर घर की या मालिकेद्वारे आपल्या ...

Shweta Basu Prasad learns new language for Chandra-Nandini | चंद्र-नंदिनी या मालिकेसाठी श्वेता बासू प्रसाद शिकतेय नवीन भाषा

चंद्र-नंदिनी या मालिकेसाठी श्वेता बासू प्रसाद शिकतेय नवीन भाषा

द्र-नंदिनी ही मालिका प्रेक्षकांचे सध्य़ा चांगलेच मनोरंजन करत आहे. श्वेता बासू प्रसादने कहानी घर घर की या मालिकेद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तिने मकडी, इकबाल यांसारख्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. मकडी या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. सध्या ती चंद्र-नंदिनी या मालिकेत काम करत आहे. 
श्वेताने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने बारावीत असताना एक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले. हा चित्रपट दक्षिणेत प्रचंड गाजला होता. श्वेताला मकडी या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यातदेखील आले आहे. 
बारावीनंतर तिने मास मीडियाचे शिक्षण घेतले आणि काही वर्षं ती छोट्या पडद्यापासून दूर राहिली. पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर चित्रपट बनवण्यासाठी किती लोक काय काय मेहनत घेतात हे जाणून घ्यायची तिला उत्सुकता होती. यासाठी तिने अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीच्या फँटममध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. तिने फँटममध्ये स्क्रिप्ट कन्सलटंट म्हणून काम केले. हे काम करत असतानाच चंद्र-नंदिनी या मालिकेद्वारे पुन्हा अभिनयक्षेत्रात येण्याचे तिने ठरवले. श्वेता आता या मालिकेत नंदिनी आणि रूपा अशा दोन भूमिका साकारते आहे. रूपा ही नंदिनीसारखी दिसत असली तरी ती स्वभावाने अतिशय दृष्ट स्त्री असल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे. रूपा या मालिकेतील भूमिकेसाठी सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. या मालिकेसाठी ती मगधी उच्चार शिकत आहे. संवाद म्हणताना अचूक आणि अस्सल उच्चार करण्यासाठी ती सध्या मालिकेच्या दिग्दर्शकांकडे या भाषेचे धडे गिरवत आहे. आगामी भागात रूपाकडून नंदिनीच्या आयुष्यात कशाप्रकारे समस्या निर्माण केल्या जातात हे दाखवले जाणार आहे. 


Web Title: Shweta Basu Prasad learns new language for Chandra-Nandini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.