श्वेता बासू प्रसाद आणि रजत टोकसची मुख्य भूमिका असलेली ‘चंद्र-नंदिनी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 14:22 IST2017-11-06T08:52:05+5:302017-11-06T14:22:05+5:30
आपण त्यांना एकमेकांविरोधात रणांगणात लढताना पाहिले आहे… आपण त्यांना परस्परांवर प्रेम करतानाही पाहिले आहे… नियतीच्या अगम्य खेळानुसार त्यांना एकमेकांपासून ...
.jpg)
श्वेता बासू प्रसाद आणि रजत टोकसची मुख्य भूमिका असलेली ‘चंद्र-नंदिनी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
आ ण त्यांना एकमेकांविरोधात रणांगणात लढताना पाहिले आहे… आपण त्यांना परस्परांवर प्रेम करतानाही पाहिले आहे… नियतीच्या अगम्य खेळानुसार त्यांना एकमेकांपासून दुरावताना आणि पालक या नात्याने पुन्हा एकत्र येतानाही पाहिले आहे… ‘स्टार प्लस’वरील ‘चंद्र-नंदिनी’ ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. पण या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवटचा भाग १० नोव्हेंबरला प्रेक्षकांचा पाहायला मिळणार आहे.
‘चंद्र-नंदिनी’ या मालिकेत नंदिनी ही राजकन्या ज्याचा अतोनात तिरस्कार करते, त्या चंद्रगुप्त या राजपुत्राशीच तिचे लग्न झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते. पण नंतरच्या काळात ती राजकन्या त्याच्यावर प्रचंड भरभरून प्रेमही करायला लागली होती. पण मलयकेतूने चंद्रगुप्त आणि नंदिनी यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच दुर्धराच्या मृत्यूस हेलेनाने नंदिनीला जबाबदार धरल्यामुळे आता चंद्र आणि नंदिनी हे प्रेमीयुगुल वेगळे होणार असे सगळ्यांना वाटत होते. पण याच दरम्यान त्यांचा मुलगा बिंदुसाराचा जन्म झाला आणि मुलाच्या प्रेमाच्या ओढीने का होईना त्यांनी दोघांनी एकत्र राहाण्याचा निर्णय घेतला. या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण नुकतेच झाले. श्वेताने या मालिकेद्वारे अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केला होता. त्यामुळे ही मालिका तिच्यासाठी खूप खास होती. या शेवटच्या भागाच्या चित्रीकरणाविषयी श्वेता बासू प्रसादने सांगितले, प्रत्येक प्रवासाचा शेवट हा असतोच. चंद्र-नंदिनीचा हा प्रवास फारच रंजक होता. या मालिकेमुळे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. ही मालिका संपत असल्याने मी खूप भावूक झाली आहे. मला या मालिकेमुळे खूप चांगल्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मी या मालिकेच्या सगळ्या टीमला खूप मिस करणार आहे. या भूमिकेसाठी मी अनेक चित्रपटांच्या ऑफर्सना नकार दिला होता. या भूमिकांकडे पाठ फिरवल्याचा मला आता नक्कीच आनंद होत आहे. ही मालिका संपल्यावर मला नंदिनीची फार आठवण येत राहील. मी लवकरच प्रेक्षकांना एका नव्या भूमिकेत पाहायला मिळेल.
Also Read : ‘चंद्र नंदिनी’ची ही अॅक्ट्रेस रियल लाइफमध्ये आहे बिकिनी क्वीन !