"आई आगीच्या दुर्घटनेत होरपळली अन् मालिकेसाठी कॉल आला...",'शुभविवाह' फेम अभिनेत्रीने सांगितला मन हेलावून टाकणारा प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 11:26 IST2026-03-15T11:22:53+5:302026-03-15T11:26:23+5:30
"माझी आई आगीच्या दुर्घटनेत होरपळली अन्...", 'शुभविवाह' फेम अभिनेत्रीने सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग

"आई आगीच्या दुर्घटनेत होरपळली अन् मालिकेसाठी कॉल आला...",'शुभविवाह' फेम अभिनेत्रीने सांगितला मन हेलावून टाकणारा प्रसंग
Madhura Deshpande : अभिनेत्री मधुरा देशपांडे हा मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून मधूराने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'झुंज', 'आराधना' तसेच 'कन्यादान' यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं. अलिकडेच मधुरा देशपांडे शुभविवाह या मालिकेत पाहायला मिळाली.या मालिकेत तिने साकारलेलं भूमी नावाचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. नाटक ते मालिका असा यशस्वी प्रवास करणाऱ्या या अभिनेत्रीचा प्रवास फार काही सोपा नव्हता. सध्या मधुरा एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात घडलेल्या वाईट प्रसंगावर भाष्य केलं आहे.
नुकतीच मधुरा देशपांडेने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली.यावेळी तिने अभिनय प्रवास तसेच त्याला कुटुंबियांचा कसा पाठिंबा होता याविषयी सांगितलं. तसेच तिने आपल्या आयुष्यात घडलेला हृदयद्रावक प्रसंग सांगितला. मधुराच्या आईचं एका आगीच्या दुर्घटनेत निधन झालं. या प्रसंगाविषयी बोलताना ती म्हणाली, पुण्यामध्ये आमच्या बिल्डिंगला आग लागली. त्यात माझ्या आईला दुखापत झाली. आमच्या कामवालीला वाचवत असताना धुरामुळे ती होरपळली. त्यावेळी मी आणि बाबा मुंबईत होतो कारण,तेव्हा मी माझ्यासाठी भाड्याने घर बघत होते.तेव्हा आमचं ठरलेलं की बुलेट ट्रेनच शूट झालं की आपण घर शोधूयात. एकेदिवशी मी शूटवरून घरी आले तर बाबा घरी नव्हते. बाबा घरी नव्हते तर आजीला मी विचारलं तर ती म्हणाली, त्याचं काहीतरी महत्वाचं काम आलंय तेव्हा ते बाहेर आले. त्यानंतर मी बाबाला फोन तर त्याने उचलला नाही.मग आईला आणि बहिणीला फोन तर त्यांनीही उचलला नाही. पण, माझ्या डोक्यात काहीच आलं नाही."
मग पुढे मधुराने सांगितलं,"तरीही माझ्या मनात काहीतरी घडलंय अशी शंका होती. त्यानंतर मी सकाळी मी शिवनेरीची गाडी पकडलीच. तेव्हा मला बाबांचा फोन आला ते म्हणाले की आई थोडी होरपळली आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत तू ये... मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा आईला ऑपरेशनला नेत होते. माझ्यासाठी माझे आई-बाबा हे सर्वस्व आहेत. त्याचवेळेस मला कन्यादान मालिकेसाठी फोन आला की तुला लीड रोल मिळाला आहे. तर, मी त्यांना सगळ्या परिस्थितीबद्दल सांगितलं. माझ्या आईची अशी अवस्था आहे तर मी मालिका करू शकत नाही. तर माझी आई मला म्हणाली, तू वेडी आहेस का... तुला तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा ब्रेक मिळतो आहे. तर तू असं काही करू नकोस. त्याच्यानंतर निर्मात्यांनी मला सांगितलं की, तू शांत हो. आपण थोडे दिवस थांबू. तेव्हा आईने मला सांगितलं होतं की, माझ्या मुलीच्या आयुष्यात चांगलं घडतंय... मला काहीच होणार नाही.तू टेन्शन नको घेऊस. आई बरी झाली आणि मला कन्यादान ही माझी पहिली मालिका सुरु झाली." असा हृदयद्रावक प्रसंग अभिनेत्रीने सांगितला.