n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">एक दुजे के वास्ते या मालिकेत प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या जोडीचा शुभविवाह पाहायला मिळणार आहे. श्रवण आणि सुमनची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. पण सुमन आणि आदित्यचे लग्न होणार होणार असल्याने प्रेक्षकांची निराशा झाली होती. एक दुजे के वास्ते या मालिकेच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. सुमन आणि आदित्यच्या लग्नाच्या आधी श्रवण आणि आदित्यची खूप भांडणे होणार आहेत. त्यामुळे आदित्य आणि सुमनचे लग्न मोडणार आहे. यामुळे सुमन चांगलीच खचणार आहे. सुमनची ही अवस्था पाहून सुमन आणि श्रवणचे लग्न करावे असे त्याच्या कुटुंबियांना वाटणार आहे आणि ते त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवणार आहेत. पण आदित्य आणि श्रवणच्या भांडणांसाठी आदित्यच जबाबदार होता हे सुमनला कळल्यावर ती त्याचा अधिका राग करायला लागणार आहे. पण त्या दोघांच्या घरातले जबरदस्तीने त्यांचे लग्न लावून देणार आहेत.