मराठी अभिनेत्रीनं दुसऱ्या लग्नानंतर घेतलं जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन, व्हिडीओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 11:06 IST2025-12-14T11:06:11+5:302025-12-14T11:06:39+5:30
सुमित म्हशीलकरने जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठी अभिनेत्रीनं दुसऱ्या लग्नानंतर घेतलं जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन, व्हिडीओ समोर
'संगीत देवभाबळी' नाटकातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते ही निर्माता सुमित म्हशीलकरसोबत ५ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकली. अत्यंत साधेपणाने त्यांनी लग्न उरकलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारयल होत आहेत. दरम्यान आता लग्नानंतर त्यांनी काल १३ डिसेंबरला जेजुरी येथील खंडोबाचं दर्शन घेतलं. "येळकोट येळकोट जय मल्हार" असं म्हणत शुभांगीच्या पतीने म्हणजे सुमित म्हशीलकरने जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
शुभांगी सदावर्ते आणि सुमित म्हशीलकर हे लग्नानंतर जेजुरीतील खंडेरायाच्या दर्शनाला गेले. परंपरेनुसार, सुमित म्हशीलकरने शुभांगीला उचलून जेजुरी गड चढला. त्यानंतर दोघांनी खंडेरायाचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी भंडाऱ्याची उधळणही केली. यावेळी शुभांगीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तर सुमितने महरुन रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता.
शुभांगीचं हे दुसर लग्न आहे. तिचं पहिलं लग्न हे प्रसिद्ध संगीतकार आनंद ओकसोबत यांच्यासोबत झालं होतं. पण, लग्नाच्या पाच वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर, २०२५ मध्ये वेगळे होत असल्याचं त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले होते. त्यानंतर काही दिवसांतच शुंभागीनं सुमित म्हशीलकरशी दुसरं लग्न केलं.
शुभांगी सदावर्तेच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तिने 'संगीत देवबाभळी' या गाजलेल्या नाटकात संत तुकारामांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं आणि तिला चांगला प्रतिसाद मिळाला. तिने नाटकासोबतच 'लक्ष्य' आणि 'नवे लक्ष्य' या लोकप्रिय मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नाही तर ती 'महाराष्ट्र शाहीर' या मराठी चित्रपटामध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे.