मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:11 IST2025-10-08T14:11:03+5:302025-10-08T14:11:49+5:30
वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री, आता कुटुंबासोबत गेली गावी

मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली...
'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शुभांगी अत्रेने व्हिडिओ शेअर केला आहे. जवळपास २५ वर्षांनंतर ती तिच्या मूळ गावी पोहोचली आहे. तिथे कुटुंबीय आणि जवळच्या लोकांसोबत तिने छान वेळ घालवला. गावाच्या आसपासचे काही ठिकाणंही फिरली. याची झलक तिने दाखवली आहे. इतक्या वर्षांनंतर गावी आल्यावर तिलाही प्रचंड आनंद झाल्याचं दिसत आहे.
शुभांगी अत्रे मध्य प्रदेशमधील इंदुरमधील एका छोट्याशा गावातली आहे. नुकतीच तिने २५ वर्षांनंतर गावी भेट दिली. इन्स्टाग्रामवर तिने व्हिडिओ शेअर केला आहे. लहानपणीच्या आठवणीत ती बुडालेली दिसत आहे. गावातले रस्ते, घरं, शेती, आणि मंदिर तिने कॅमेऱ्यात कैद केले आहेत. कुटुंबियांसोबत छान फोटो काढले आहेत. जेवणाचा आस्वाद घेतला आहे. गावाबाहेरील प्रसिद्ध पुनासा धरणालाही तिने आईवडिलांसोबत भेट दिली. तिथे फोटोसेशन केलं. या सगळ्या क्षणांचं रील शेअर करत तिने लिहिले, "वेळ जणू इथेच थांबली आहे. २५ वर्षांनंतर माझ्या मूळ गावी आल्यानंतर अनेक आठवणी जाग्या झाल्या."
शुभांगी अत्रेला 'भाभीजी घर पर है' मुळे ओळख मिळाली. याआधी तिने 'कसोटी जिंदगी की','कस्तुरी','चिडिया घर' या मालिकांमध्येही दिसली. मधल्या काळात ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. काही महिन्यांपूर्वी तिने पती पियुषपासून घटस्फोट घेतला. त्यांना एक मुलगी आहे. धक्कादायक म्हणजे घटस्फोटानंतर दोन महिन्यातच पियुषचं निधन झालं. त्याला लिव्हर सिरॉसिस आजार झाला होता.