'शुभविवाह' फेम अभिनेत्याची 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत जबरदस्त एन्ट्री, साकारणार दुर्गाच्या भावाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 11:25 IST2024-06-21T11:24:22+5:302024-06-21T11:25:31+5:30

मालिका रंजक वळणावर असतानाच आता 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. 'शुभविवाह' फेम अभिनेता या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

shubh vivah fame actor ruchir gurav to play important role in navri mile hitler la serial | 'शुभविवाह' फेम अभिनेत्याची 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत जबरदस्त एन्ट्री, साकारणार दुर्गाच्या भावाची भूमिका

'शुभविवाह' फेम अभिनेत्याची 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत जबरदस्त एन्ट्री, साकारणार दुर्गाच्या भावाची भूमिका

'नवरी मिळे हिटलरला' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. राकेश बापट, वल्लरी लोंढे अशी स्टारकास्ट असलेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकतंच मालिकेत एजे आणि लीला यांचं लग्न पार पडलं आहे. मालिका रंजक वळणावर असतानाच आता 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. 'शुभविवाह' फेम अभिनेता या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

या मालिकेत अभिनेत्री शर्मिला शिंदे दुर्गा हे पात्र साकारत आहे. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत आता दुर्गाच्या भावाची एन्ट्री होणार आहे. अभिनेता रुचिर गुरव हे पात्र साकारताना दिसणार आहे. रुचिर दुर्गाचा भाऊ यश ही भूमिका साकारणार आहे. शर्मिलाने रुचिरबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने रुचिरला शुभेच्छा दिल्या आहेत. "दुर्गाचा भाऊ यशला हॅलो म्हणा", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

रुचिर गुरव याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'स्वाभिमान' मालिकेत तो दिसला होता. त्याने मयांक हे पात्र साकारलं होतं. सध्या तो स्टार प्रवाहवरील 'शुभविवाह' या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तो भूमीचा भाऊ प्रशांत हे पात्र साकारत आहे. 

Web Title: shubh vivah fame actor ruchir gurav to play important role in navri mile hitler la serial