२० वर्षानंतर भेटली बहीण-भावाची लाडकी जोडी, 'शिऱ्या' आणि 'शलाका'चं बदलतं रुप पाहून व्हाल थक्क

By देवेंद्र जाधव | Updated: June 26, 2025 11:56 IST2025-06-26T11:55:02+5:302025-06-26T11:56:02+5:30

२० वर्षानंतर शिऱ्या आणि शलाकाची लाडकी जोडी एकमेकांना भेटली आहे. या दोघांना पाहून त्यांचे चाहते थक्क झाले आहेत.

shriyut gangadhar tipre serial shirya shalaka reshma naik vikas kadam meet after 20 years | २० वर्षानंतर भेटली बहीण-भावाची लाडकी जोडी, 'शिऱ्या' आणि 'शलाका'चं बदलतं रुप पाहून व्हाल थक्क

२० वर्षानंतर भेटली बहीण-भावाची लाडकी जोडी, 'शिऱ्या' आणि 'शलाका'चं बदलतं रुप पाहून व्हाल थक्क

'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिका सर्वांना आठवत असेलच. या मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. या मालिकेतील सर्वात गाजलेलं कॅरेक्टर म्हणजे शिऱ्या आणि शलाका. मालिकेतील ही बहीण-भावाची लाडकी जोडी प्रेक्षकांचं मन जिंकून गेली. कधी एकमेकांशी मस्ती करणारी, कधी दिलखुलास गप्पा मारणारी, कधी भावनित प्रसंगात एकत्र येणारी ही जोडी सर्वांच्या हृदयाला स्पर्श करुन गेली. आता तब्बल २० वर्षांनंतर ही जोडी एकमेकांना भेटली आहे. तेव्हा दोघांचंही बदलतं रुप पाहून त्यांचे चाहते थक्क झाले आहेत.  

शिऱ्या आणि शलाका एकमेकांना भेटले

'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेतील शलाका अर्थात अभिनेत्री रेश्मा नाईकने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिने शिऱ्या इन द टाऊन असं कॅप्शन लिहिलंय. या फोटोसोबत रेश्माने शिऱ्या अर्थात विकास कदमसोबतचा फोटो शेअर केला आहे. शिऱ्या आणि शलाका या फोटोमध्ये ओळखूच येत नाहीत इतके ते बदलले आहेत. शिऱ्याने निळा कुर्ता आणि डोळ्यांवर चष्मा परिधान केलाय. तर शलाकाने पंजाबी ड्रेस परिधान करुन लाडक्या शिऱ्यासोबत खास पोज दिली आहे.

आता काय करतात शिऱ्या - शलाका?

'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिका संपून आता २० वर्ष झाली तरीही या मालिकेतील ऑन स्क्रीन कलाकारांचे ऑफ स्क्रीन किती घट्ट नातं आहे, हेच यातून पाहायला मिळतं. जसं वेळ मिळेत तसं विकास आणि रेश्मा एकमेकांना भेटत असतात. दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर, विकास सध्या कोणत्याही नवीन सिनेमा, मालिकेत झळकत नाही. विकासने काही वर्ष बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबतही काम केलं. तर दुसरीकडे रेश्माने अभिनय क्षेत्रापासून दूर वेगळी वाट निवडली आहे. रेश्माचं लग्न झालं असून ती आता कुटुंबाकडे लक्ष देत आहे.

Web Title: shriyut gangadhar tipre serial shirya shalaka reshma naik vikas kadam meet after 20 years