श्रिया पिळगांवकर दिसणार पत्रकाराच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 17:22 IST2018-10-15T17:22:43+5:302018-10-15T17:22:51+5:30
निसर्गाचा सुंदर अविष्कार असणा-या मसूरी शहराच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते. एकेएस या निष्ठूर सीरियल किलरची ही गोष्ट आहे

श्रिया पिळगांवकर दिसणार पत्रकाराच्या भूमिकेत
वीयू या आघाडीच्या ओटीटी व्यासपीठातर्फे आणखी एक खिळवून ठेवणारा क्राइम ड्रामा सादर होत आहे… १३ मसूरी हा वीयूचा हिंदीतील १०वा ओरिजनल शो असणार आहे.
निसर्गाचा सुंदर अविष्कार असणा-या मसूरी शहराच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते. एकेएस या निष्ठूर सीरियल किलरची ही गोष्ट आहे. सातत्याने होणा-या खुनांमागे असलेल्या या माणसाला शोधण्याची घाई अवघ्या मसूरी शहराला आहे. शहरातील प्रसिद्ध वरीष्ठ पोलिस अधिकारी अजय बिश्त (नावेद अस्लम) यांची मुलगी आणि ख्यातनाम पोलिस अधिकारी रिशी पंत (विराफ पटेल) यांची पत्नी असलेली निडर पत्रकार अदिती बिश्त (श्रीया पिळगावकर) हे प्रकरण सोडवण्याच्या मोहिमेवर आहे आणि ती या गुन्हेगाराला शोधतेही. मात्र, या दरम्यान कथेत अनेक वळणं येत राहतात.
या सायकोलॉजिकल थ्रीलरमध्ये तुम्हाला खिळवून ठेवणारे, हादरवणारे १३ एपिसोड्स आहेत. हे एपिसोड्स १२ ऑक्टोबरपासून फक्त वीयूवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असतील.
या सीरिजच्या सादरीकरणानिमित्त यात रिशी पंत ही मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते विराफ पटेल म्हणाले, “१३ मसूरीच्या कथेतील ट्विस्ट आणि टर्न्स काही भन्नाट सरप्राइजेसनी प्रेक्षकांच्या मनाची पडक घेतील. मात्र, या क्राइम ड्रामामधील व्यक्तीरेखांमधील हृदय नातेसंबंध हे या कथेचे वैशिष्ट्य आहे. ही सीरिज वियूच्या प्रेक्षकांना बरेच काही देणार आहे. त्यामुळे, प्रेक्षकांना याची नक्कीच उत्सुकता असेल”.