श्रेयस तळपदेनं पत्नीसोबतचा व्हिडीओ शेअर करत व्यक्त केलं प्रेम, होतोय कमेंट्सचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 16:38 IST2021-12-15T16:37:49+5:302021-12-15T16:38:48+5:30
श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)ने इंस्टाग्रामवर पत्नी दीप्ती तळपदे (Dipti Talpade) सोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

श्रेयस तळपदेनं पत्नीसोबतचा व्हिडीओ शेअर करत व्यक्त केलं प्रेम, होतोय कमेंट्सचा वर्षाव
मराठी-हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सध्या माझी तुझी रेशीमगाठ (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेत काम करताना दिसतो आहे. या मालिकेत त्याने यशची भूमिका साकारली आहे. या मालिकेत यश, नेहा आणि परीची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते. श्रेयस सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. बऱ्याचदा तो सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतीच शेअर केलेली त्याची पोस्ट खूप चर्चेत आली आहे.
श्रेयस तळपदेने इंस्टाग्रामवर पत्नी दीप्ती तळपदेसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते दोघे बोलताना आणि श्रेयस तिच्या खांद्यावर डोके ठेवताना दिसतो आहे. ते दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहे. श्रेयसने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, कधीकधी तुम्हाला तुमच्या प्रेमाची प्रशंसा करण्यासाठी वेळ काढावा लागतो. आज पुन्हा एकदा माझ्यासाठी तो दिवस आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो दीप्स. तू मला मनापासून हसवतेस. तू असण्याबद्दल धन्यवाद.
श्रेयस आणि दीप्ती यांचे लव्ह मॅरेज असून ते दोघे ३१ डिसेंबर २००४ साली विवाह बंधनात अडकले. श्रेयस आणि दीप्ती यांना एक मुलगी आहे, जिचे नाव आद्या आहे. दीप्ती खंबीरपणे श्रेयसच्या पाठिशी उभी राहते. दुसरीकडे श्रेयसही आपल्या सगळ्या यशाचे श्रेय त्याच्या पत्नीलाच देतो. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.