श्रेया बुगडेचं 'या' प्रसिद्ध अभिनेत्याशी आहे खास नातं; म्हणाली, 'तुझ्याशिवाय आयुष्याला अर्थच...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 13:03 IST2023-03-29T13:02:56+5:302023-03-29T13:03:45+5:30

श्रेया बुगडेने एका स्पेशल व्यक्तीसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

shreya bugde marathi actress shares special post for piyush ranade on his birthday | श्रेया बुगडेचं 'या' प्रसिद्ध अभिनेत्याशी आहे खास नातं; म्हणाली, 'तुझ्याशिवाय आयुष्याला अर्थच...'

श्रेया बुगडेचं 'या' प्रसिद्ध अभिनेत्याशी आहे खास नातं; म्हणाली, 'तुझ्याशिवाय आयुष्याला अर्थच...'

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडेने (Shreya Bugde) एका स्पेशल व्यक्तीसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. प्रसिद्ध अभिनेता पियुष रानडेसाठी (Piyush Ranade) तिने भावना व्यक्त केल्या आहेत. श्रेया आणि पियुषसोबत बहीण भावाचं नातं आहे असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

श्रेया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. दैनंदिन जीवनातील अपडेट्स देत असते. तसंच जवळच्या व्यक्तींसाठी प्रेमही व्यक्त करते. नुकतेच तिने अभिनेता पियुष रानडेसोबत फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेयाला सख्खा भाऊ नाही म्हणून तिने पियुषलाच भाऊ मानलं. दोघंही भाऊबीज आणि रक्षाबंधन सुद्धा साजरं करतात.

श्रेयाने पोस्टमध्ये लिहिलं, 'तू नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहेस आणि तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला अर्थच नाही. प्रत्येक मुलीला तुझ्यासारखा भाऊ मिळाला तर हे जग किती सुंदर होईल. मोठ्या भावासोबत आयुष्य नेहमीच खूप सुंदर असतं. तू माझा आयुष्यभराचा चांगला मित्र सुद्धा आहेस. तुझा वाढदिवस एकत्र साजरा केल्याने मी खूप खूश आहे दादू. '

श्रेया आणि पियुषची ओळख 'एकाच या जन्मी जणू' या मालिकेच्या सेटवर झाली होती. तेव्हापासून त्यांच्यात बहीण भावाचं नातं तयार झालं. मालिकेतही ते बहीण भावाच्या भूमिकेतच होते. मालिका संपल्यानंतरही त्यांचं हे नातं सुरुच राहिलं. 

Web Title: shreya bugde marathi actress shares special post for piyush ranade on his birthday