मनोरंजन जगताला आणखी एक धक्का, ‘श्री गणेश’ फेम अभिनेत्याचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 09:59 IST2020-06-11T09:58:48+5:302020-06-11T09:59:33+5:30

गेल्या दोन महिन्यांत अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. आता चाहत्यांसाठी आणखी एक दु:खद बातमी आहे.

shree ganesha amita ka amit fame actor jagesh mukati passes away | मनोरंजन जगताला आणखी एक धक्का, ‘श्री गणेश’ फेम अभिनेत्याचे निधन

मनोरंजन जगताला आणखी एक धक्का, ‘श्री गणेश’ फेम अभिनेत्याचे निधन

ठळक मुद्देहिंदी टीव्ही मालिका व चित्रपटांत काम करणारे जागेश गुजराती रंगभूमीवरही लोकप्रिय होते.

गेल्या दोन महिन्यांत अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. आता चाहत्यांसाठी आणखी एक दु:खद बातमी आहे. टीव्ही अभिनेते जागेश मुकाती यांनी काल 10 जूनला अखेरचा श्वास घेतला.
‘अमिता का अमित’ आणि ‘श्री गणेश’ या टीव्ही मालिकांसोबत अनेक चित्रपटांतही जागेश यांनी काम केले आहे. जागेश गेल्या तीन-चार दिवसांपासून रूग्णालयात भरती होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सिनेमा व टीव्ही जगतात पुन्हा एकदा शोककळा पसरली.

 ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची अंबिका रंजनकर हिने जागेश यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत, सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली.
‘दयाळू, मदतगार आणि हजरजबाबी... खूप लवकर निघून गेलेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. प्रिय मित्रा जागेश तुझी आठवण सतत येईल,’ असे अंबिकाने लिहिले.
हिंदी टीव्ही मालिका व चित्रपटांत काम करणारे जागेश गुजराती रंगभूमीवरही लोकप्रिय होते.
या वर्षात मनोरंजन जगतातील अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. इरफान खान, ऋषी कपूर, संगीतकार वाजिद खान, प्रीता मेहता, मनमीत ग्रेवाल, चिरंजीवी सरजा असे महान कलाकार आपण या वर्षांत गमावले.

Read in English

Web Title: shree ganesha amita ka amit fame actor jagesh mukati passes away