​नकुशी मालिकेचे झाले मनालीत चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 14:28 IST2017-03-16T08:58:29+5:302017-03-16T14:28:29+5:30

मालिका म्हटल्या की त्याचे चित्रीकरण एखाद्या सेटवर होते. हिंदी मालिकांमध्ये तरी मालिकांचे आऊटडोर शूट केले जाते. पण मराठीत याचे ...

Shooting of Nakushi series in Manali | ​नकुशी मालिकेचे झाले मनालीत चित्रीकरण

​नकुशी मालिकेचे झाले मनालीत चित्रीकरण

लिका म्हटल्या की त्याचे चित्रीकरण एखाद्या सेटवर होते. हिंदी मालिकांमध्ये तरी मालिकांचे आऊटडोर शूट केले जाते. पण मराठीत याचे खूपच कमी प्रमाण पाहायला मिळते. पण सध्या मराठी मालिकांनी ट्रेंड बदलला असून मराठी मालिकांचे आऊटडोर चित्रीकरणदेखील होत आहे. त्याचसोबत आता मराठी मालिकादेखील परदेशात किंवा राज्याच्या बाहेर जाऊन चित्रीकरण करायला लागले आहेत. 
नकुशी तरी हवीहवीशी या मालिकेत नकुशी आणि रणजित यांचे लग्न होऊन कित्येक महिने झाले आहेत. पण त्या दोघांना एकमेकांसाठी द्यायला वेळच मिळालेला नाही. त्यांच्यात असलेले तणाव दूर झाले असून आता कथेला एक वेगळे वळण मिळणार आहे. त्यांच्या दोघांच्या आयुष्यात आता चांगले क्षण आलेले आहेत. रणजित नकुशीला घेऊन फिरायला गेलेला आहे. नकुशी आणि रणजित हनिमुनला गेले असून त्यांच्या आयुष्याला एक वळण मिळणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच मनाली येथे करण्यात आले. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे प्रसिद्धी आयलवार आणि उपेंद्र लिमये यांनी मनालीच्या थंड वातावरणात नकुशीच्या काही भागांचे चित्रीकरण केले.
नकुशी या मालिकेचे चित्रीकरण मनाली येथे झाल्याचे स्वतः उपेंद्रने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. त्याने नकुशीच्या शुटिंगचे काही मजेशीर क्षण असे कॅप्शन देत काही फोटो पोस्ट केले आहेत आणि त्याचसोबत नकुशी अॅट मनाली असा हॅशटॅग त्या फोटोंना दिला आहे. त्यामुळे नकुशीच्या फॅन्सना या चित्रीकरणाबाबत कळले आहे. या त्याच्या पोस्टवर अनेक लाइक्स आल्या असून अनेकांनी त्यावर कमेंट्सदेखील दिल्या आहेत. तसेच उपेंद्रची ही पोस्ट अनेक जणांनी शेअरदेखील केली आहे.  



Web Title: Shooting of Nakushi series in Manali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.