'पिंगा गं पोरी पिंगा'मध्ये धक्कादायक वळण, मिठूवर झाला हल्ला, पिंगा गर्ल्स हादरल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 17:57 IST2025-03-26T17:56:32+5:302025-03-26T17:57:19+5:30

Pinga Ga Pori Pinga Serial : 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. आता या मालिकेत धक्कादायक वळण आले आहे.

Shocking twist in 'Pinga Ga Pori Pinga', Mithu attacked, Pinga Girls shocked | 'पिंगा गं पोरी पिंगा'मध्ये धक्कादायक वळण, मिठूवर झाला हल्ला, पिंगा गर्ल्स हादरल्या

'पिंगा गं पोरी पिंगा'मध्ये धक्कादायक वळण, मिठूवर झाला हल्ला, पिंगा गर्ल्स हादरल्या

पिंगा गं पोरी पिंगा मालिके(Pinga Ga Pori Pinga Serial)नं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. आता या मालिकेत धक्कादायक वळण आले आहे. मिठूच्या सरप्राइझची वाट पाहत असलेल्या पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात अचानक एक मोठा धक्का बसला. तेजा आणि हर्षितसाठी खास सरप्राईज प्लॅन करणारी मिठू काही वेळातच घरात गंभीर अवस्थेत आढळली.

तेजाने हाक मारण्यासाठी आत जाताच तिच्या किंकाळीनं पिंगा गर्ल्सचं घरं हादरवलं. पिंगा गर्ल्ससमोर कठीण आव्हान उभे राहिले आहे. या एका घटनेमुळे पिंगा गर्ल्सची मैत्री पणाला लागणार आहे. मिठूवर घडलेल्या प्रसंगामुळे पाचही जणी हादरल्या आहेत, संपूर्ण घर अस्वस्थ झाले आहे. संपूर्ण प्रसंगामागील सत्य शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. घटनेच्या कारणांमागे नेमकी कोणती पार्श्वभूमी आहे, याचा शोध घेण्याचं आव्हान आता उभं राहिलं आहे. वल्लरीसाठी आता नवी परीक्षा उभी राहिली आहे. सर्वात स्थिरबुद्धीची आणि जबाबदार असलेल्या वल्लरीला आता मैत्रिणींना सांभाळावं लागणार आहे. संपूर्ण ग्रुप भावनिक तणावात असताना,त्यांना आधार देणं आणि पुढील योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करणं, ही तिच्यासमोरची महत्त्वाची जबाबदारी आहे. 

पिंगा गर्ल्सची मैत्री अजून घट्ट होईल का ?

या घटनेनंतर पिंगा गर्ल्समधील नातेसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तुटलेल्या घराला सावरण्याचे काम वल्लरी आणि प्रेरणा करत आहेत. श्वेता आणि तेजा मानसिकदृष्ट्या खचल्या असून प्रेरणा आणि वल्लरी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. पिंगा गर्ल्सची मैत्री अजून घट्ट होईल का ?कि त्यांच्यातील दुरावा आणखीनच वाढेल ? या परिस्थितीत पिंगा गर्ल्स एकत्र राहील की या घटनेमुळे मैत्रीवर परिणाम होईल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. 


पोलीस तपास सुरू होणार असून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत अनेक अनुत्तरित गोष्टीसमोर येणार आहेत.वल्लरी आणि तिच्या मैत्रिणींनी आता एकत्र येऊन या घटनेचं सत्य शोधण्याची गरज आहे. संपूर्ण प्रकरण उलगडण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी त्यांना मोठा लढा द्यावा लागणार आहे. मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Shocking twist in 'Pinga Ga Pori Pinga', Mithu attacked, Pinga Girls shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.