'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण, अनिरुद्ध संजनाला देतो घटस्फोटाची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 13:10 IST2022-04-25T13:09:48+5:302022-04-25T13:10:22+5:30
Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण, अनिरुद्ध संजनाला देतो घटस्फोटाची धमकी
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. संजनाने देशमुखांचे घर स्वतःच्या नावावर केले आहे. त्यामुळे घरातील सर्व तिच्यावर नाराज झाले आहेत. दरम्यान आता मालिका धक्कादायक वळणावर आली आहे. अनिरुद्ध संजनाला घटस्फोटाची धमकी देतो. त्यामुळे संजना घराचे पेपर आप्पांना देते.
आई कुठे काय करते मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. त्यात आप्पा संजनाला बोलताना दिसत आहेत की, संजना आता सस्पेन्स पूरे. काय बोलायचंय तुला. आई हे घराचे पेपर्स. त्यानंतर संजना बोलते की, अनिरुद्ध आता तरी खूश आहेस ना तू. तू घटस्फोट देणार नाहीस ना मला. त्यावर कांचन आई घटस्फोट म्हणून अवाक् होते. त्यावर संजना सांगते की अनिरुद्ध मला म्हणाला की, माझ्या आई वडिलांचे घर परत कर नाहीतर मी तुला घटस्फोट देईन. संजनाचे हे म्हणणे ऐकून सर्वांना धक्का बसतो.
अनिरुद्धने घटस्फोटाची धमकी दिल्यामुळे अखेर संजनाला नमते घ्यावे लागले. तिने घाबरून आप्पांना घराचे पेपर्स परत दिले. आता पुढे काय घडणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. नुकताच मालिकेत कांचन आईचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी नाराज झालेले आप्पादेखील उत्साहाने वाढदिवस साजरा करताना दिसले. नाराज झालेली विशाखा तिचा नवरा, अरुंधती असे सर्वजण मोठ्या आनंदाने वाढदविस साजरा केला. यावेळी फॅमिली फोटो काढताना अनिरुद्ध अरुंधतीलादेखील फोटोत सहभागी करून घेतो.