Shocking!! कॅप्टन बनताच Bigg Boss 19च्या घरातून बेघर झाला प्रणित मोरे? एलिमिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 10:56 IST2025-11-01T10:55:57+5:302025-11-01T10:56:36+5:30
Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९'मध्ये 'वीकेंड का वार'च्या आधीच एक धक्कादायक एलिमिनेशन झाल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे, नुकताच नवा कॅप्टन बनलेला प्रणित मोरे घराबाहेर पडला आहे.

Shocking!! कॅप्टन बनताच Bigg Boss 19च्या घरातून बेघर झाला प्रणित मोरे? एलिमिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट
'बिग बॉस १९'मध्ये 'वीकेंड का वार'च्या आधीच एक धक्कादायक एलिमिनेशन झाल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे, नुकताच नवा कॅप्टन बनलेला प्रणित मोरे घराबाहेर पडला आहे. प्रणितचे हे एविक्शन चाहत्यांना मोठा धक्का देणारे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रणित मोरेला आरोग्याच्या कारणामुळे बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, त्याला नेमका कोणता त्रास झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण या एविक्शनमध्ये एक मोठा ट्विस्ट आहे.
'बिग बॉस तक'नुसार, प्रणित मोरेला घरातून बेघर करण्यात आले असले तरी, त्याला सीक्रेट रूममध्ये पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे, त्याला आरोग्याच्या कारणामुळे बाहेर काढल्याची चर्चाही आहे. जर तो सीक्रेट रूममध्ये गेला असेल, तर ही माहिती घरातील इतर सदस्यांना देण्यात आलेली नाही.
🚨 BREAKING! Pranit More has been EVICTED from the Bigg Boss 19 house. However, he has been moved to the Secret Room.
— BBTak (@BiggBoss_Tak) October 31, 2025
वोटिंगमध्ये अव्वल असतानाही बाहेर
'बिग बॉस १९' चा सध्या १० वा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात अशनूर कौर, अभिषेक बजाज आणि मृदुल तिवारी यांना सोडून सर्व सदस्य नॉमिनेटेड होते. चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकांना वाचवण्यासाठी सतत मतदान करत आहेत. 'बिग बॉस वोट इन' नुसार, सध्याच्या (सकाळी १० वाजून २७ मिनिटांपर्यंत) वोटिंग ट्रेंडवर नजर टाकल्यास, प्रणित मोरेला सर्वाधिक मते मिळाली होती. बॉटम टू मध्ये आता नीलम आणि कुनिका यांची नावे आहेत.

चाहते पडले चिंतेत
भरपूर मते मिळाली असतानाही आरोग्याच्या कारणामुळे प्रणित मोरेला घराबाहेर काढण्यात आले आहे. याचा अर्थ, आता कदाचित या आठवड्यात दुसरे कोणतेही एलिमिनेशन होणार नाही. असे झाल्यास, कुनिका पुन्हा एकदा बेघर होण्यापासून वाचेल. प्रणित मोरेच्या या बातमीनंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे आणि ते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. तसेच, सीक्रेट रूममध्ये गेल्यानंतर प्रणित मोरेचा गेम कसा बदलेल आणि त्याच्यासमोर कोणाचे खरे रूप येईल, याबद्दलही उत्सुकता आहे.