Shocking! जुही परमार आणि सचिन श्रॉफ घेणार घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 11:59 IST2017-09-18T06:29:03+5:302017-09-18T11:59:03+5:30
जुही परमार आणि सचिन श्रॉफ हे छोट्या पडद्यावरचे एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी आजवर अनेक रिअॅलिटी शो मध्ये ...
.jpg)
Shocking! जुही परमार आणि सचिन श्रॉफ घेणार घटस्फोट
ज ही परमार आणि सचिन श्रॉफ हे छोट्या पडद्यावरचे एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी आजवर अनेक रिअॅलिटी शो मध्ये हजेरी लावली आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. पण आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ते दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत.
जुही परमारला प्रेक्षक कुमकुम म्हणूनच ओळखतात. कुमकुम प्यारा सा बंधन या मालिकेत तिने साकारलेली कुमकुमची भूमिका चांगलीच गाजली होती. तसेच काही वर्षांपूर्वी ती बिग बॉस या कार्यक्रमात देखील झळकली होती. बिग बॉसचे विजेतेपद देखील तिने मिळवले होते. २००९ मध्ये तिने सचिन श्रॉफ सोबत लग्न केले होते. सचिन हा व्यवसायिक असण्यासोबतच छोट्या पडद्यावरचा एक प्रसिद्ध अभिनेता देखील आहे. त्याने सिंदूर तेरे नाम का, नागिन यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
सचिन आणि जुहीच्या लग्नाला आठ वर्षं झाले असून आता ते दोघे घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार ते दोघे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहात आहेत. जुही आणि सचिन यांना चार वर्षांची मुलगी आहे. तिचे नाव समायरा असून ती सध्या जुहीसोबत राहात आहे. जुही आणि सचिनच्या लग्नानंतर सगळे काही सुरळीत सुरू होते. सुरुवातीच्या काळात त्या दोघांचे एकमेकांवर खूपच प्रेम होते. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे.
सचिन गेल्या कित्येक दिवसांपासून जुहीसोबत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीये. कर्मपाल दाता शनी या कार्यक्रमाच्या लाँचिंगच्या प्रसंगी देखील सचिन अनुपस्थित राहिला होता. एवढेच नव्हे तर जुहीच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला जुही नेहमीच तिच्या मुलीसोबत फोटो पोस्ट करत असते. पण या फोटोंमध्ये सचिन कधीच दिसत नाही.
जुहीने जी साहब या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने त्यानंतर वो या मालिकेत काम केले होते. पण तिला चुडिया या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
Also Read : अभिनयाव्यतिरिक्त या गोष्टींमध्ये रमते जुही परमार,अदा खान,जिज्ञासा सिंह यांचे मन