Shocking ! मलायकानंतर आणखीन एक अभिनेत्री देणार नव-याला घटस्फोट, 10 वर्षाचे नाते येणार संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 11:12 IST2020-01-09T11:08:26+5:302020-01-09T11:12:21+5:30

संजीदा शेखने 'क्या होगा निम्मो का' या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

Shocking! After Malaika, Actress Sanjeeda Sheikh Divorces her husband Aamir Ali‎ ,10 Year Relationship Ends | Shocking ! मलायकानंतर आणखीन एक अभिनेत्री देणार नव-याला घटस्फोट, 10 वर्षाचे नाते येणार संपुष्टात

Shocking ! मलायकानंतर आणखीन एक अभिनेत्री देणार नव-याला घटस्फोट, 10 वर्षाचे नाते येणार संपुष्टात

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. मिळालेल्या माहितीनुसार ब्रेकअपच्या लिस्टमध्ये आणखीन एक नाव सामिल झाले आहे ते आमिर अली आणि संजीदा शेख. टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक लोकप्रिय कपल अशी या दोघांची आतापर्यंतची ओळख.  अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर कुटुंबियांच्या संमंतीने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2012 मध्ये आपल्या नात्याला नवीन ओळख देत लग्नबंधनात अडकले. मात्र आता यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दोघांचे नातं संपुष्टात आले आहे. मात्र अद्याप यामागचे नेमके कारण कळू शकलेले नाही. ऐवढेच नाही तर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलोदेखील केले आहे. अद्याप दोघांनी घटस्फोट घेतलेला नसला तरी लवकरच संजीदा आमिरला घटस्फोट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर या दोघांचे रोमांटीक  फोटो इतरांना जरी कपल गोल देत असले तर रिअर लाईफमध्ये मात्र यांचे नाते फेल ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे दोघे वेगळे होणार या बातमीनेच त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का तर बसणारच तसेच कितने अजीब रिश्ते है यहाँ पे ही ओळ आठवल्याशिवाय राहणार नाही. 

संजीदा शेखने 'क्या होगा निम्मो का' या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती आज अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. ती गेल्या काही वर्षांत 'जाने पहचाने से अजनबी', 'एक हसिना थी' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. त्यातील तिच्या अनेक मालिका प्रचंड हिट झाल्या आहेत.

Web Title: Shocking! After Malaika, Actress Sanjeeda Sheikh Divorces her husband Aamir Ali‎ ,10 Year Relationship Ends