प्रसिद्ध अभिनेत्याच्या बहिणीला बसला गॅस तुडवड्याचा फटका?, रेस्टॉरंट करावं लागलं बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:33 IST2026-03-31T11:25:34+5:302026-03-31T11:33:29+5:30
Saba ibrahim: सबा प्रसिद्ध युट्यूबर असून तिचे मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी रेस्टॉरंट आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्याच्या बहिणीला बसला गॅस तुडवड्याचा फटका?, रेस्टॉरंट करावं लागलं बंद
आखातातील युद्धामुळे गॅस सिलिंडरच्या टंचाई वाढत होत असून त्याचा फटका घरगुती गॅसधारकांसोबतच हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायिकांनाही होत आहे. सिलेंडरच्या तुडवड्यामुळे आतापर्यंत अनेक हॉटेल, रेस्टॉरंटच्या पुढे बंदची पाटी लावण्यात आली आहे. याच गॅस तुडवड्याचा फटका प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेता शोएब इब्राहिम याची बहीण सबा इब्राहिम हिला बसला आहे. सबाला तिचं रेस्टॉरंट बंद करावं लागलं आहे.
सबा प्रसिद्ध युट्यूबर असून तिचे मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी रेस्टॉरंट आहेत. परंतु, गॅस टंचाईचा फटका सबाच्या खुशामदीद या रेस्टॉरंटला बसला असून तिला हे रेस्टॉरंट तात्पुरत्या स्वरुपात बंद करावं लागलं आहे. सबाने युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करत याविषयीची माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाली सबा?
एकीकडे गॅस सिलेंडर मिळवण्यास अडचण येत आहे. तर दुसरीकडे उंदरांनी रेस्टॉरेंटमध्ये उच्छाद मांडला आहे. त्यामुळे मला पुन्हा एकदा रेस्टॉरंटचं रिनोव्हेशन करावं लागणार आहे. सबाने पुढील १५ ते २० दिवस रेस्टॉरंट बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. परंतु, रेस्टॉरंट जरी बंद राहीलं तरीदेखील त्यांची ऑनलाइन फूड डिलिव्हरची सेवा सुरु राहणार असल्याचंही तिने यावेळी सांगितलं.
दरम्यान, रेस्टॉरंट तात्पुरत्या स्वरुपात बंद राहणार असल्यामुळे सबाच्या पतीला याचं बरंच दु:ख झालं आहे. याविषयी त्यांनी या व्हिडीओमध्येही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.