"तिच्या लिव्हरचा भाग कापून टाकावा लागला", १४ तास सुरू होती दीपिकाची सर्जरी, शोएबने दिले हेल्थ अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 09:30 IST2025-06-07T09:29:58+5:302025-06-07T09:30:19+5:30

दीपिकाची सर्जरी १४ तास सुरू होती. आता तिला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आलं आहे, असं शोएबने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे.

shoaib ibrahim gives health updated about dipika kakar and surgery said she is out of icu | "तिच्या लिव्हरचा भाग कापून टाकावा लागला", १४ तास सुरू होती दीपिकाची सर्जरी, शोएबने दिले हेल्थ अपडेट

"तिच्या लिव्हरचा भाग कापून टाकावा लागला", १४ तास सुरू होती दीपिकाची सर्जरी, शोएबने दिले हेल्थ अपडेट

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर लिव्हर कॅन्सरचा सामना करत आहे. काही दिवसांपूर्वी तिला लिव्हर ट्युमरचे निदान झाले. त्यानंतर तो ट्युमर कॅन्सरचा असल्याचं समजल्यानंतर दीपिकासह तिच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला होता. सध्या दीपिका यावर उपचार घेत असून नुकतीच तिच्यावर सर्जरी करण्यात आली आहे. या सर्जरीबाबत आणि दीपिकाच्या हेल्थबाबत तिचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिमने अपडेट दिले आहेत. 

दीपिकाची सर्जरी १४ तास सुरू होती. आता तिला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आलं आहे, असं शोएबने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे. शोएब म्हणाला, "उद्या ईद आहे आणि आज दीपिका आयसीयूमधून बाहेर आली. ती आयसीयूमधून बाहेर आली आहे आणि आमच्यासोबत आहे, यासाठी मी आभार मानतो. तीन दिवस दीपिका आयसीमध्ये होती. सर्जरीनंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. म्हणून डॉक्टरांनी आता तिला नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवस ती हॉस्पिटलमध्येच राहील. कारण, सर्जरी मोठी होती. ती १४ तास ऑपरेशन थिएटरमध्ये होती". 

पुढे शोएबने सांगितलं, "डॉक्टरांनी आधीच सांगितलं होती की सर्जरी खूप वेळ चालणार आहे. त्यामुळे आम्ही चिंतेत होतो. तिला सकाळी ८.३० वाजता सर्जरीसाठी घेऊन जाण्यात आलं आणि रात्री ११.३० वाजता तिला बाहेर आणलं. दीपिकाला आयसीयूमध्ये शिफ्ट केल्यानंतर आम्ही तिला भेटलो. संध्याकाळी ६-७ वाजता आम्ही सगळे घाबरले होते. कारण, ऑपरेशनबाबत काहीच अपडेट नव्हती. कारण, आम्ही एवढी गंभीर सर्जरी कधीच पाहिली नव्हती. पण, डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की जर ते अपडेट देण्यासाठी बाहेर आले नाहीत तर सर्जरी व्यवस्थित चालू आहे आणि ती पूर्णपणे ठीक होईल".

"दीपिकाच्या पित्ताशयमध्ये एक खडा होता. सर्जरी करताना तोदेखील काढण्यात आला आहे. दीपिकाच्या लिव्हरचा छोटा भाग कापून टाकावा लागला कारण ट्यूमर कॅन्सरयुक्त होता. लिव्हर स्वत:च स्वत:ची रिकव्हरी करत असतं. त्यामुळे आम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. पण, आम्हाला सतर्क राहून तिची काळजी घ्यावी लागणार आहे", असंही शोएबने सांगितलं.  

Web Title: shoaib ibrahim gives health updated about dipika kakar and surgery said she is out of icu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.