Shiv Jayanti: "प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस...", शिवनेरीच्या पायथ्याशी मराठी अभिनेत्रीची शिवगर्जना, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:47 IST2026-02-19T13:47:22+5:302026-02-19T13:47:51+5:30

Shiv Jayanti 2026 Celebration: मराठी अभिनेत्रीने शिवजयंतीनिमित्त तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती शिवनेरीच्या पायथ्याशी शिवगर्जना देताना दिसत आहे. 

shivjayanti 2026 marathi actress ruchira jadhav shared shivgarjana video shivneri fort | Shiv Jayanti: "प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस...", शिवनेरीच्या पायथ्याशी मराठी अभिनेत्रीची शिवगर्जना, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Shiv Jayanti: "प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस...", शिवनेरीच्या पायथ्याशी मराठी अभिनेत्रीची शिवगर्जना, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Shiv Jayanti 2026: आज १९ नोव्हेंबर हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण राज्यभरात आज उत्साहाचं वातावरण आहे. ठिकठिकाणी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक नेतेमंडळी आणि कलाकारांनीही शिवजयंतीच्या शुभेच्छा सोशल मीडियावरुन चाहत्यांना दिल्या आहेत. मराठी अभिनेत्रीने शिवजयंतीनिमित्त तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती शिवनेरीच्या पायथ्याशी शिवगर्जना देताना दिसत आहे. 

अभिनेत्री रुचिरा जाधवने तिच्या सोशल मीडियावरुन व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये रुचिराने नऊवारी साडीत मराठमोळा लूक केल्याचं दिसत आहे. शिवनेरीच्या पायथ्याशी उभी राहून ती शिवगर्जना देताना दिसत आहे. आज शिवजयंती निमित्त तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. रुचिराचा हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी अभिनेत्रीचं कौतुकही केलं आहे. 


"महाराज, तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत.🙏🏻 तुम्ही कायम असाल आमच्या विचारांमध्ये, आमच्या कृतीमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.🚩 महाराष्ट्र माझा’ या गाण्याच्या निमित्ताने जुन्नरला जाण्याचा योग आला. शिवनेरीच्या पायथ्याशी शूट केलं आणि त्यामुळे गडावर गेल्याशिवाय राहवलं नाही. पहाटे सहा वाजताचा सूर्योदय गडावर अनुभवला. स्वराज्याचा सूर्यही तिथेच जन्मला होता. त्या वास्तूने दिलेले शहारे आजही अंगावर येतात…गर्जना दिल्याशिवाय राहवलं नाही. ती महाराजांची जन्मभूमी आहे. त्यांचं पवित्र जन्मस्थान आणि after all, जाधव कन्या आहोत", असं रुचिराने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

Web Title : शिवजयंती: अभिनेत्री ने शिवनेरी में दी श्रद्धांजलि, देशभक्ति से भर गया माहौल।

Web Summary : शिवजयंती पर, अभिनेत्री रुचिरा जाधव ने शिवाजी महाराज की जन्मभूमि, शिवनेरी किले में श्रद्धांजलि अर्पित की। पारंपरिक परिधान में, उन्होंने एक शक्तिशाली 'शिवगर्जना' (युद्धघोष) दिया। रुचिरा ने वीडियो सोशल मीडिया पर साझा किया, जिससे उनकी प्रस्तुति के लिए प्रशंसा मिली और दर्शकों में देशभक्ति की भावना जागृत हुई।

Web Title : Shivjayanti: Actress's powerful tribute at Shivneri evokes chills and pride.

Web Summary : On Shivjayanti, actress Ruchira Jadhav paid tribute at Shivneri fort, the birthplace of Shivaji Maharaj. Dressed in traditional attire, she delivered a powerful 'Shivgarjana' (war cry). Ruchira shared the video on social media, drawing praise for her performance and evoking a sense of pride among viewers.