शिवानीची अंगठी हरवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 12:45 IST2016-06-29T07:15:56+5:302016-06-29T12:45:56+5:30

जाने ना दिल से दूर या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी शिवानी सुर्वे सध्या खूप दुःखी आहे. या मालिकेचे चित्रीकरण ...

Shivani's finger was lost | शिवानीची अंगठी हरवली

शिवानीची अंगठी हरवली

ने ना दिल से दूर या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी शिवानी सुर्वे सध्या खूप दुःखी आहे. या मालिकेचे चित्रीकरण मुंबई येथे सुरू होते. या चित्रीकरणाच्या दरम्यान तिची हिऱयाची अंगठी हरवली. ही अंगठी शिवानीच्या आईने तिला भेट म्हणून दिली होती. मालिकेत पावसाचे दृश्य चित्रीत करायचे होते. सध्या मुंबईत खूपच चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे कृत्रिम पावसात चित्रीकरण करण्यापेक्षा टीमने मुंबईच्या पावसात चित्रीकरण करण्याचे ठरवले. या चित्रीकरणाच्यावेळी शिवानीची अंगठी हरवली आणि हे तिच्या खूपच नंतर लक्षात आले. मालिकेच्या संपूर्ण टीमने तिची अंगठी शोधण्याचा प्रयत्न केला. पण काही केल्या कोणालाच ही अंगठी मिळाली नाही. या अंगठीच्या किमतीपेक्षा ही अंगठी शिवानीला तिच्या आईने दिल्यामुळे तिच्यासाठी ती अधिक मौल्यवान असल्याचे ती सांगते.

Web Title: Shivani's finger was lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.