९ वर्षानंतर शिवानी सुर्वेचा दमदार कमबॅक, नव्या मालिकेचा भन्नाट प्रोमो रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 08:39 IST2024-05-09T08:38:35+5:302024-05-09T08:39:38+5:30

देवयानी मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या शिवानी सुर्वेच्या नवीन मालिकेचा जबरदस्त प्रोमो रिलीज झालाय (shivani surve, Thod Tuz Ani Thod Maz)

Shivani Surve new serial Thod Tuz Ani Thod Maz serial promo out | ९ वर्षानंतर शिवानी सुर्वेचा दमदार कमबॅक, नव्या मालिकेचा भन्नाट प्रोमो रिलीज

९ वर्षानंतर शिवानी सुर्वेचा दमदार कमबॅक, नव्या मालिकेचा भन्नाट प्रोमो रिलीज

'देवयानी' मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे. शिवानी गेल्या काही वर्षांपासून सिनेमात झळकली पण मालिकाविश्वात फारशी दिसली नाही. पण आता शिवानीच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी. तब्बल ९ वर्षांनी शिवानी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत कमबॅक करत आहे. स्टार प्रवाहची नवी मालिका 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मधून शिवानी तब्बल ९ वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे.

'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत शिवानी मानसी सणस ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असलेली मानसी. वडिलांचं स्वप्न मानसीला पूर्ण करायचं आहे. आपल्या कॉलेजची टॉपर गायत्री मॅडमच्या हुशारीवर मानसी खूप प्रभावित आहे. पण आपल्या समोर कुणालाही जिंकू न देणाऱ्या गायत्रीच्या स्वार्थी स्वभावाची तिला कल्पना नाही. खरी ठिणगी तेव्हा पडते जेव्हा मानसी पदवी परिक्षेत टॉप करत गायत्रीचा रेकॉर्ड मोडते. तेव्हाही स्वतःच्या हुशारीने मानसी गायत्रीपेक्षा वरचढ ठरते. नातं परिपूर्ण होण्यासाठी थोडं तुझं आणि थोडं माझं असावं असं तिला वाटतं. 

तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वे फारच उत्सुक आहे. स्टार प्रवाह कुटुंबासोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा तिला आनंद आहे. स्टार प्रवाहच्या मालिकांचे विषय, त्याची मांडणी मला खूपच भावते. त्यामुळेच 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेसाठी मी लगेच होकार दिला. मानसी हे पात्र मला अतिशय आवडलं. 'देवयानी' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. हेच प्रेम आणि यश माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे. या मालिकेत शिवानीसोबत अभिनेत्री मानसी कुलकर्णीही झळकणार आहे. शिवानीची ही नवीन मालिका १७ जूनपासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर बघायला मिळेल.

Web Title: Shivani Surve new serial Thod Tuz Ani Thod Maz serial promo out