शिवानी सुर्वे - अजिंक्य ननावरेने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन, चरणांवर डोकं ठेऊन घेतला बाप्पाचा आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 10:30 IST2024-09-08T10:29:38+5:302024-09-08T10:30:02+5:30

शिवानी सुर्वे - अजिंक्य ननावरे या कलाकार जोडीने लालबाग राजाचं मनोभावे दर्शन घेऊन व्हिडीओ शेअर केलाय (lalbagcha raja)

Shivani Surve and ajinkya nanavare visit lalbagcha raja and mumbaicha raja ganeshgalli | शिवानी सुर्वे - अजिंक्य ननावरेने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन, चरणांवर डोकं ठेऊन घेतला बाप्पाचा आशीर्वाद

शिवानी सुर्वे - अजिंक्य ननावरेने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन, चरणांवर डोकं ठेऊन घेतला बाप्पाचा आशीर्वाद

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. सामान्य नागरीकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांच्या घरी बाप्पा विराजमान झालाय. अनेक कलाकार आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी विविध मंडळांना भेट देत असतात. गणेशोत्सव म्हटला की, लालबागचा राजाचं (lalbagcha raja) दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटींपासून सामान्य नागरिक उत्सुक असतात. अशातच मराठमोळी कलाकार जोडी शिवानी सुर्वे (shivani surve) आणि अजिंक्य ननावरे (ajinkya nanavare) यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय. 

शिवानी सुर्वे- अजिंक्य ननावरे लालबाग राजा चरणी नतमस्तक

काही महिन्यांपूर्वीच शिवानी सुर्व आणि अजिंक्य ननावरे या दोघांनी लग्न केलं. दोघेही आपापल्या मालिकांच्या शूटींगमध्ये व्यस्त असतात. अशातच शिवानी - अजिंक्य या दोघांनी मालिकेच्या शूटींगमधून वेळात वेळ काढून लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. दोघांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत दोघेही सुरुवातीला मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या दर्शनासाठी गेलेले दिसतात. नंतर हे दोघेही लालबागच्या राजाच्या चरणांवर नतमस्तक होताना दिसतात.


शिवानी-अजिंक्यने घेतला बाप्पाचा आशीर्वाद

या दोघांच्या व्हिडीओमध्ये बघता येईल की, गर्दीतून वाट काढत दोघेही लालबाग राजाचं दर्शन घेतात. बाप्पाच्या चरणांवर डोकं ठेऊन दोघांनी फोटो काढलेले दिसतात. "गणपती बाप्पा मोरया.. लालबागच्या राजाचा विजय असो !", असं कॅप्शन देत दोघांनीही खास फोटोशूट केलेलं दिसलं. शिवानी सध्या 'थोडं तुझं आणि थोडं माझं' या मालिकेत झळकत आहे. तर अजिंक्य सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत काम करतोय. 

Web Title: Shivani Surve and ajinkya nanavare visit lalbagcha raja and mumbaicha raja ganeshgalli