लग्नानंतर शिवानी सोनार साजरी करतेय पहिली दिवाळी, म्हणाली- "एक वेगळीच उत्सुकता आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 17:36 IST2025-10-21T17:35:59+5:302025-10-21T17:36:33+5:30

Shivani Sonar : तारिणी मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार तिची पहिली दिवाळी सासरी साजरी करणार आहे आणि तिच्या आनंदाला पारावर उरलेला नाही.

Shivani Sonar is celebrating her first Diwali after marriage, she said- ''There is a different kind of curiosity...'' | लग्नानंतर शिवानी सोनार साजरी करतेय पहिली दिवाळी, म्हणाली- "एक वेगळीच उत्सुकता आहे..."

लग्नानंतर शिवानी सोनार साजरी करतेय पहिली दिवाळी, म्हणाली- "एक वेगळीच उत्सुकता आहे..."

दिवाळी ही प्रत्येकासाठी खास असते, पण एका नवविवाहित स्त्रीसाठी ती आणखीनच खास भावना घेऊन येते. पहिली दिवाळी सासरी साजरी करणं आणि ते ही नव्या घरात, नव्या माणसांत आपली ओळख निर्माण करणं आणि जुन्या आठवणींना नव्या आनंदाने सजवणे. तारिणी मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार तिची पहिली दिवाळी सासरी साजरी करणार आहे आणि तिच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. 

शिवानी सोनार म्हणाली की, "आजपर्यंत मी प्रत्येक वर्षी आई-वडिल आणि भावासोबत घरी दिवाळी साजरी केली आहे, पण यंदा माझं लग्नानंतरचं पहिलं वर्ष आहे आणि पहिली दिवाळी सासरी असल्यामुळे एक वेगळीच उत्सुकता आहे. मी कायम सगळे दिवाळीचे रितीरिवाज पाळले आहेत, मग तो फराळ करणं असो, रांगोळी काढणं, अभ्यंगस्नान, किल्ला बनवणं आणि यंदाही शूटिंग सुरू असतानाही शक्य असेल तेवढं सगळं करणार आहे. यंदाचा दिवाळी पाडवा माझ्यासाठी खास आहे, कारण हा माझा पहिला पाडवा आहे आणि अंबरने माझ्यासाठी काहीतरी सरप्राइझ प्लॅन केलं आहे, त्यामुळे मी खूपच एक्सायटेड आहे. 


दिवाळीमधल्या फराळाबद्दल जेव्हा शिवानीला विचारले गेले की ती कोणत्या पदार्थसारखी आहे. त्यावर ती म्हणाली, "मला असं वाटतं की मी करंजीसारखी आहे, बाहेरून कडक पण आतून गोड. कारण कधी कधी लोकांना वाटतं मी अ‍ॅटीट्यूडवाली, रागीट, आहे, पण तसं काही नाही. जेव्हा मी कुणावर जीव लावते, तेव्हा मी त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या खूप जोडली जाते. यंदाची भाऊबीज खास आहे कारण माझ्या भावाला पहिली नोकरी लागली आहे आणि तो मला यंदा स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून गिफ्ट घेणार आहे. याआधी आईवडिल त्याला गिफ्ट घेऊन द्यायचे आणि तो मला द्यायचा. पण यंदा तो स्वतः कमावून देणार आहे.  माझ्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. यंदाची दिवाळी खरंच सगळ्या अर्थाने माझ्यासाठी स्पेशल आहे."

Web Title : शिवांगी सोनार शादी के बाद पहली दिवाली मना रही हैं, उत्साहित!

Web Summary : अभिनेत्री शिवांगी सोनार शादी के बाद अपनी पहली दिवाली मनाने के लिए उत्साहित हैं। वह दिवाली के रीति-रिवाजों को संजोती हैं और अपने पति से एक विशेष आश्चर्य की उम्मीद करती हैं। उनके भाई की पहली नौकरी इस साल की भाऊबीज को और भी खास बनाती है।

Web Title : Shivani Sonar celebrates first Diwali after marriage with excitement.

Web Summary : Actress Shivani Sonar is excited to celebrate her first Diwali after marriage. She cherishes Diwali rituals and anticipates a special surprise from her husband. Her brother's first job makes this year's Bhaubeej even more special.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.