शिवानी रांगोळेच्या खऱ्या लग्नात राहून गेली 'ही' गोष्ट; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 14:57 IST2023-09-03T14:56:08+5:302023-09-03T14:57:10+5:30

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’  या मालिकेत अक्षरा हे पात्र साकारुन शिवानी रांगोळे घराघरात पोहचली आहे.

Shivani Rangole Talk About Her Real Life Marriage | शिवानी रांगोळेच्या खऱ्या लग्नात राहून गेली 'ही' गोष्ट; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीचा खुलासा

Shivani Rangole

झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे. या मालिकेत अक्षरा आणि अधिपतीच्या नात्यात एक नवे आणि रोमांचक वळण येणार आहे. येत्या 4 सप्टेंबरपासून या मालिकेत अक्षरा आणि अधिपतीचा साखरपुडा विशेष सप्ताह प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)


‘तुला शिकवीन चांगलाच धडा’  या मालिकेत अक्षरा हे पात्र साकारुन शिवानी रांगोळे ही घराघरात पोहचली. टीव्हीवर अक्षरा आणि अधिपतीची जोडी प्रेक्षकांना आवडत असून दोघांचे साखरपुड्यातील लूकचे फोटो समोर आले आहेत. अक्षराने साखरपुड्यात लाल काठा पदराची पांढरी साडी तर अधिपतीनेही अक्षराला मॅचिंग लाल रंगाचा कोट, पांढरा रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे.

दोघेही या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. पण शिवानीच्या खऱ्या आयुष्यात तिचा साखरपुडा सुद्धा झाला नसल्याचे तिने  ‘कलाकृती मीडिया’ या यूट्युब चॅनेलशी बोलताना सांगितले.  खऱ्या लग्नात पुर्ण न झालेली हौस मालिकेच्या निमित्तानं पूर्ण झाल्याचे तिने सांगितलं. 

‘कलाकृती मीडिया’ या यूट्युब चॅनेलशी अक्षरा आणि अधिपतीनं संवाद साधला. यावेळी "तुमच्या खऱ्या लग्नात करायची राहिली होती अशी कोणती गोष्ट आहे आणि ती हौस आता इथे लग्नाच्या निमित्तानं पूर्ण करून घेताय", असा प्रश्न दोघांना विचारलं. यावर शिवानी म्हणाली,  "मला ‘टू स्टेट्स’ हे पुस्तक खूप आवडतं.  त्या पुस्तकात दिलेल्या पद्धतीनं माझ लग्न व्हावं, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे माझ्या खऱ्या लग्नात आमचा सगळ्यांचा पोशाख हा दाक्षिणात्य पद्धतीत होता. यावेळी मला पांढरी आणि लाल रंगाची साडी नेसायची होती. मात्र हे काही घडलं नाही".

पुढे ती म्हणाली, "आता साखरपुड्याच्या सीनमध्ये मी पांढरी आणि लाल रंगाची साडी नेसली आहे. आमची निर्मात्या शर्मिष्ठा ताईनं स्वतः ही साडी निवडली. तेव्हा मी माझ्या आईला लगेच म्हटलं, बघ तिथे तू नाही म्हणाली होतीस, आता मी इथे माझी हौस पूर्ण करून घेतेय. शिवाय, खऱ्या आयुष्यात आम्ही एकमेंकाना प्रपोज आणि थेट लग्नच केलं. त्यात आमचा साखरपुडा झाला नाही. मालिकेच्या निमित्तानं आता साखरपुड्याची हौस सुद्धा पूर्ण झाली”.


अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं म्हणून ओळखलं जातं. त्या दोघांनी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. विराजस आणि शिवानी हे गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.


 

Web Title: Shivani Rangole Talk About Her Real Life Marriage