शिवानी रांगोळेनं पहिल्या मकरसंक्रांतीच्या आठवणींना दिला उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 19:35 IST2024-01-09T19:33:37+5:302024-01-09T19:35:19+5:30
Shivani Rangole : सध्या शिवानी रांगोळे 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

शिवानी रांगोळेनं पहिल्या मकरसंक्रांतीच्या आठवणींना दिला उजाळा
अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) हिने अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी कलाविश्वात ओळख मिळवली. बालकलाकार म्हणून तिने अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केली. शिवानीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 'बन मस्का' या मालिकेमुळे शिवानीला लोकप्रियता मिळाली. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. सध्या ती 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
२०२४चा पहिला सण आणि त्यात लग्नानंतरची पहिली संक्रांत ही नेहमी खास असते. झी मराठीची मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अक्षराची ही दुसरी मकरसंक्रांत आहे आणि त्या निमित्ताने शिवानी रांगोळेने आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रातीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
शिवानी रांगोळे हिने सांगितले की,विराजस आणि माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतला आम्ही हलव्याचे दागिने घालून छान फोटोशूट केला होता. ह्या वर्षी विराजस त्याच्या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहे आणि मी 'तुला शिकवीन चांगलाच धडाच्या' शूटिंग मध्ये, पण जर आम्हाला सुट्टी मिळाली तर आम्ही आईच्या हातचं स्वादिष्ट जेवण जेवायला घरी पुण्याला जाऊ. मकरसंक्रांतची अस्सल मज्जा आमच्या पुण्याच्या घरच्या गच्चीवर येते तिथे आम्ही मस्त पतंग उडवतो.