/>स्टार प्लसवरील ‘जाना ना दिल से दूर’ या नव्या मालिकेची नायिका शिवानी सुर्वे हिला नवी मैत्रीण मिळाली आहे. होय, ही नवी मैत्रिण म्हणजे शिल्पा तुळसकर. शिल्पा म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील परिचित चेहरा. पण शिवानी शिल्पाला पहिल्यांदा भेटली आणि तिला ती जाम आवडली. अलीकडे दोघींमध्ये छान मैत्री जमली आहे. मग काय, वेळ मिळेल तसा शिल्पा व शिवानी दोघीही गप्पा मारताना दिसतात. विक्रमसिंह चौहानची चेष्टा-मस्करी करणे आणि गप्पा मारणे हा या दोघींचा फावल्या वेळातील उद्योग असतो. बरेचदा शिवानी शिल्पासाठी खास घरचे पदार्थ घेऊन सेटवर येते. माझ्यात व शिल्पाजी यांच्यात घट्ट मैत्री जमली आहे. मी निराश होते, तेव्हा शिल्पाजींशी शेअर करते. त्या एक उत्तम कलाकारच नाही तर एक चांगल्या व्यक्ति आहेत, असे शिवानी सांगते.