​शिवम वानखेडे ठरला 2 MAD कार्यक्रमाचा विजेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 12:47 IST2017-04-19T07:17:12+5:302017-04-19T12:47:12+5:30

2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या नृत्यातील मॅडनेसने ...

Shivam Wankhede was the winner of 2 MAD program | ​शिवम वानखेडे ठरला 2 MAD कार्यक्रमाचा विजेता

​शिवम वानखेडे ठरला 2 MAD कार्यक्रमाचा विजेता

2 MA
D – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या नृत्यातील मॅडनेसने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. 2 MAD या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची सगळ्यांना कित्येक दिवसांपासून उत्सुकता लागली होती. परीक्षक आणि प्रेक्षकांनी केलेल्या मतदानामधून आता महाराष्ट्राचा अस्सल डान्सर निवडला गेला आहे. शिवम वानखेडेने 2MAD महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या कार्यक्रमाचे विजेतपद मिळवले असून राहुल कुलकर्णी आणि सोनल विचारे यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे. 
2 MADच्या ग्रँड फिनालेमध्ये पूजा सांवत आणि वैभव तत्त्ववादी यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या फिनालेला परीक्षकांनीदेखील त्यांच्या नृत्याची अदाकारी दाखवली. उमेश जाधव यांनी बायगो बायगो आणि संजय जाधव यांनी ये जवानी है दिवानी या गाण्यावर डान्स सादर केला. त्यांच्या दोघांचाही परफॉर्मन्स उपस्थितांना प्रचंड आवडला. तसेच 2 MADची परीक्षक अमृता खानविलकरने आपल्या दिलखेचक आणि अप्रतिम नृत्याने ग्रँड फिनालेची रंगत अजूनच वाढवली. तसेच प्रसिद्ध कोरिओग्राफर धर्मेशने आवाज वाढवा डीजे, ओ काका या गाण्यांवर परफॉर्मन्स केला. 
2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सरचा विजेता शिवम वानखेडेला तब्बल दोन लाख आणि गोल्डन ट्रॉफी मिळाली. विजेतेपद मिळाल्यानंतर तो खूपच खूश झाला होता. आपली भावना व्यक्त करताना तो म्हणाला, “2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर जिंकून माझे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. आता पुढे मला माझ शिक्षण पूर्ण करायचे आहे. भविष्यात मला मोठा नृत्यदिग्दर्शक आणि डान्सर व्हायचे आहे. तसेच हृतिक रोशन हा माझा आवडता डान्सर असल्याने त्याच्या एखाद्या गाण्याची मला कोरिओग्राफी करायला आहे तर राहुल कुलकर्णी आणि सोनल विचारेला अनुक्रमे सिल्वर आणि ब्रांझ ट्रॉफी तसेच एक लाख रुपये मिळाले.




Web Title: Shivam Wankhede was the winner of 2 MAD program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.