'शिवा' मालिका रंजक वळणावर, शिवाला लवकरच मिळणार प्रपोजलचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 15:17 IST2024-11-16T15:16:36+5:302024-11-16T15:17:24+5:30
Shiva Serial : 'शिवा' मालिका रंजक वळणावर आली आहे. संपदा सर्वांना शिवाने आशूला प्रपोज केल्याचे सांगते आणि शिवाला लवकरच तिच्या प्रपोजलचं उत्तर मिळणार आहे.

'शिवा' मालिका रंजक वळणावर, शिवाला लवकरच मिळणार प्रपोजलचं उत्तर
'शिवा' मालिकेने (Shiva Serial) कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील शिवा आणि आशूची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. आता ही मालिका रंजक वळणावर आली आहे. संपदा सर्वांना शिवाने आशूला प्रपोज केल्याचे सांगते आणि शिवाला लवकरच तिच्या प्रपोजलचं उत्तर मिळणार आहे.
मालिकेत आशू शिवाची आवडती मिठाई घेऊन वस्तीत जातो. पण दिव्या मुद्दाम मिठाईचा बॉक्स खाली पाडते. आशुने शिवाच्या आवडीची मिठाई आणली म्हणून आजी खूश आहे. शिवा आणि आशू घरी येताच घरातील सर्वजण आशूला उत्तर कधी देणार असं विचारताच आशू लाजून निघून जातो. आशूच्या मनातही शिवाबद्दल काहीतरी आहे म्हणून आशुने शिवाच्या आवडीच्या रंगाचा शर्ट घातलाय, त्याच रंगाची फुले आणलेत, शिवाच स्केच् भिंतीवर लावलाय, संपूर्ण खोली नीटनेटकी ठेवलेय, हे सगळं पाहून शिवा भारावून जाते.
आशू सकाळी लवकर उठून घरातील सगळी कामे करतो. दुसरीकडे दिव्या गावी पोहोचताचतीला चंदनच्या खऱ्या परिस्थितीबद्दल समजते तेंव्हां तिचा राग अनावर होतो. सकाळी किचनमधे आशू शिवाला मदत करत असल्याचे पाहून सीताईला हनिमूनला गेल्यावर दोघांमध्ये काहीतरी घडलं असल्याचा संशय येतो. शिवाचा वाढदिवस जवळ येत आहे तेव्हा आशू तिच्यासाठी काहीतरी खास प्लॅन करायचं ठरवतो. आशू मध्यरात्री सायकलवर चहा विकणाऱ्या माणसाला घेऊन येतो. आशू शिवामध्ये झालेले छोटे छोटे बदल नोटीस करतो. शिवा घरातील सर्वांना बोलावून कीर्ती व सुहासला माफ केलं पाहिजे हे समजावुन सांगते. सीताई आणि कीर्ती शिवाच्या छोट्या केसांबद्दल बोलतात तेव्हां आशू वेगळ्याच पद्धतीने शिवाच्या केसात गजरा माळतो. शिवाला लवकरच प्रपोजलचे उत्तर मिळणार आहे.