n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">झी मराठीवरील लोकप्रिय मालिका काहे दिया परदेसमध्ये शिव आणि गौरीचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. आधी गौरीच्या वडिलांना असलेला शिवचा विरोध त्यात वहिनींनी रचलेले कुटील डाव , शिवच्या अम्माचा असलेला या लग्नाला विरोध आणि गौरीबद्दलचा त्यांच्या मनातील तिरस्कार अशा अनेक अग्नीपरीक्षा पार करत शिव गौरीचं हे नातं आता लग्नाच्या मांडवात आलं आहे. हे लग्न जरी पार पडत असलं तरी शिवच्या अम्माच्या मनातला गौरीबद्दलचा राग अजूनही कमी झालेला नाही. हा विवाह सोहळा आनंदात पार पडणार की अम्मा परत एखादी नवी खेळी खेळणार ? आणि यात निशा वहिनीचा सहभाग असणार का? हे एका विशेष भागातून बघायला मिळणार आहे. शिव गौरीचा हा शानदार विवाह सोहळा प्रेक्षकांना येत्या रविवारी म्हणजे ९ ऑक्टोबरला दोन तासांच्या विशेष भागात रात्री ७ ते ९ या वेळेत बघायला मिळणार आहे.
![]()
![]()
![]()