अमरावतीचा वाघ झाला मुंबईकर! महागड्या कारनंतर शिव ठाकरेचं घराचं स्वप्नही झालं पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 09:32 AM2024-01-02T09:32:21+5:302024-01-02T09:33:18+5:30

'झलक दिखला जा' शो मध्ये शिवने ही गुडन्यूज शेअर केली.

Shiv Thakre bought new house in mumbai after his brand new car worth 30 lakhs | अमरावतीचा वाघ झाला मुंबईकर! महागड्या कारनंतर शिव ठाकरेचं घराचं स्वप्नही झालं पूर्ण

अमरावतीचा वाघ झाला मुंबईकर! महागड्या कारनंतर शिव ठाकरेचं घराचं स्वप्नही झालं पूर्ण

रिएलिटी शोचा मास्टर, अमरावतीचा वाघ शिव ठाकरे (Shiv Thakre) आता मुंबईकर झाला आहे. शिवने मुंबईत हक्काचं घर घेतल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आधी ३० लाखांची ब्रँड न्यू कार आणि आता मुंबईत घर यामुळे शिवचे चाहत्यांनाही खूप आनंद झाला आहे. सध्या शिव 'झलक दिखला जा' शो मध्ये आपल्या डान्सने प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. याच शोमध्ये शिवने नवीन घराबाबतचा खुलासा केला आहे.

बिग बॉस मराठी 2 चं विजेतेपद पटकावल्यानंतर शिवने हिंदी बिग बॉसही गाजवलं. तिथेही तो रनर अप ठरला. यानंतर त्याने 'खतरो के खिलाडी' मध्येही भाग घेतला. सध्या शिव 'झलक दिखला जा' मध्ये स्पर्धक म्हणून आपल्या डान्सची झलक प्रेक्षकांना दाखवत आहे. दरम्यान होस्ट ऋत्विक धनजानीने शिवला 2023 हे वर्ष कसं होतं याबाबत प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला,'हे वर्ष माझं आयु्ष्य बदलून गेलं. सुरुवात थोडी हळू झाली होती पण नंतर अनेक बदल झाले. मला वाटायचं मी आयुष्यात एखादी सेकंड हँड कार घेईन पण यावर्षी मी ३० लाखांची ब्रँड न्यू कार खरेदी केली. असं म्हणतात मुंबईत घर घेण्यासाठी अख्खं आयुष्य लागतं पण आज झलक दिखला जाच्या कुटुंबासोबत हे शेअर करताना मला आनंद होतोय की मी मुंबईत नवीन घर घेतलं आहे. ८ दिवसांपूर्वीच मी घर बुक करुन आलो आहे.'

शिवने ही गुडन्यूज देताच ऋत्विकला त्याला घराच्या चाव्या आणायला सांगतो. तेव्हा परिक्षकाच्या भूमिकेत असलेली फराह खान म्हणते,'तू घराची चावी आणली आहेस. मला साजिदने कालच तुझ्या नवीन घराबद्दल सांगितलं. म्हणून मी तुझ्यासाठी हे गिफ्ट म्हणून गणेशाची मूर्ती आणली आहे. यानंतर शिव सगळ्यांना घराच्या चाव्या दाखवतो आणि फराह खानकडून आशीर्वाद घेतो.

Web Title: Shiv Thakre bought new house in mumbai after his brand new car worth 30 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.