'या' खास व्यक्तीबरोबर शिव ठाकरेने साजरा केला व्हॅलेंटाइन डे, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 13:13 IST2025-02-14T13:11:10+5:302025-02-14T13:13:27+5:30

शिव ठाकरेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Shiv Thakare Valentine Day Celebration With Grandmother Video Viral | 'या' खास व्यक्तीबरोबर शिव ठाकरेने साजरा केला व्हॅलेंटाइन डे, पाहा व्हिडीओ

'या' खास व्यक्तीबरोबर शिव ठाकरेने साजरा केला व्हॅलेंटाइन डे, पाहा व्हिडीओ

Shiv Thakare: 'बिग बॉस मराठी २' मधून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता शिव ठाकरे याने आपल्या वागण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याने 'रोडीज', खतरों के खिलाडी' यासारख्या रिऍलिटी शोमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यातही मराठी प्रेक्षकांमध्ये तो गाजला. शिव ठाकरे आपल्या सध्या अंदाजामुळे खूप चर्चेत राहतो. तो सर्व तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. आज व्हॅलेंटाईन डे (valentine day) आहे. हा खास दिवस त्यानं एका खास व्यक्तीसोबत साजरा केला आहे. शिव ठाकरेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे


दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे म्हणजे प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी प्रियकर-प्रेयसी आणि पती-पत्नी एकमेकांवरील प्रेम जाहीर करतात.  व्हॅलेंटाईन डे हा केवळ प्रेमसंबंधांपुरता मर्यादित नाही. हा दिवस कोणत्याही प्रकारचे प्रेम आणि आपुलकीचा उत्सव असू शकतो. मित्र, कुटुंब आणि प्रियजनांमध्ये हा दिवस साजरा करूनही प्रेम व्यक्त केले जाते. शिव ठाकरेनं एखाद्या मुलीसोबत नाही तर त्याच्या प्रिय आजीसोबत हा प्रेमाचा दिवस साजरा केलाय. 


शिवनं ठाकरेनं व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात शिव आजीला गाडीतून उतरवताना दिसतोय.  यानंतर तो तिला एक कॅफेमधून घेऊन जातो. तिथं तो आजीसाठी खास गुलाबांच्या पाकळ्यांचं हार्ट बनवताना दिसतो. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.  व्हिडीओमध्ये आजी आणि नातवाचं प्रेम पाहून नेटकरी देखील भारावले आहेत. शिवचा त्याच्या आजीवर प्रचंड जीव आहे. तो कायम सोशल मीडियावर आजीचे फोटो व्हिडीओ शेअर करत असतो. मुळचा अमरावतीचा असलेला शिव हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. 

Web Title: Shiv Thakare Valentine Day Celebration With Grandmother Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.