पोलिस बाप्पा! शिव ठाकरेने केलं खाकी वेशातील गणरायाचं स्वागत; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 09:40 AM2023-09-18T09:40:50+5:302023-09-18T09:42:36+5:30

पोलिसांना त्याने दिलेलं हे ट्रिब्युट आहे. 

shiv thakare unveils police bappa ganesh murti at mumbai chowpaty tribute to police officers | पोलिस बाप्पा! शिव ठाकरेने केलं खाकी वेशातील गणरायाचं स्वागत; Video व्हायरल

पोलिस बाप्पा! शिव ठाकरेने केलं खाकी वेशातील गणरायाचं स्वागत; Video व्हायरल

googlenewsNext

सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाची लगबग दिसून येत आहे. घरोघरी गणरायाचं आगमन होत आहे. वेगवेगळ्या वेशातील सुंदर गणपतीच्या मूर्ती बघायला मिळत आहे. 'बिग बॉस' फेम शिव ठाकरेने (Shiv Thakare) काल पोलिसांच्या गणवेशातील बाप्पाच्या मूर्तीचं अनावरण केलं. चौपाटीवर पोलिसांसोबत सहभागी होत त्याने पोलिस बाप्पाचं स्वागत केलं. पोलिसांना त्याने दिलेलं हे ट्रिब्युट आहे. शिवचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठी बिग बॉसचा विजेता आणि हिंदी बिग बॉसचा रनर अप ठरलेला सर्वांचा लाडका शिव ठाकरे त्याच्या साधेपणासाठीही ओळखला जातो. ना कोणता अॅटिट्यूड ना कुठला बडेजाव. शिव नेहमीच सगळ्यांसमोर हसतमुख असतो. गरजूंची मदत करण्यासाठी तर तो कायम पुढाकार घेतो. काल मुंबईत पोलिस बाप्पाच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं. शिव आणि पोलिसांच्या हस्ते चौपाटीवर खाकी वेशातील गणरायाची मूर्ती स्थापन केली गेली. पोलिसांच्या वेशातील बाप्पाच्या स्वागताला मोठी गर्दीही झाली. सर्वांनी जल्लोषात गणरायाला विराजमान केलं. शिवचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

शिव ठाकरे नेहमी काहीतरी हटके करत असतो. त्याचा हाच स्वभाव चाहत्यांना भलताच आवडतो. शिव सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. त्याची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. शिव लवकरच काही सिनेमांमध्ये दिसणार आहे. सध्या तो मराठी आणि हिंदी दोन्ही मनोरंजनसृष्टीत चांगलाच लोकप्रिय ठरत आहे.

Web Title: shiv thakare unveils police bappa ganesh murti at mumbai chowpaty tribute to police officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.