Shiv Thakare: बिग बॉसनंतर शिव ठाकरेला लागली लॉटरी, 'खतरों के खिलाडी 13'नंतर दिसणार 'या' शोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 12:21 PM2023-06-08T12:21:08+5:302023-06-08T12:21:55+5:30

शिव ठाकरेला 'बिग बॉस १६'नंतर लॉटरी लागली असं म्हणालं तर वावगं ठरणार नाही.

Shiv thakare to appear in sonu sood prince narula rhea chakraborty roadies karm yakaand after khatron ke khiladi | Shiv Thakare: बिग बॉसनंतर शिव ठाकरेला लागली लॉटरी, 'खतरों के खिलाडी 13'नंतर दिसणार 'या' शोमध्ये

Shiv Thakare: बिग बॉसनंतर शिव ठाकरेला लागली लॉटरी, 'खतरों के खिलाडी 13'नंतर दिसणार 'या' शोमध्ये

googlenewsNext

अमरावतीचा शिव ठाकरेने (Shiv Thakare) अल्पावधीतच लाखो जणांच्या हृदयावर राज्य केलं आहे. त्याच्या साधेपणाने त्याने सर्वांचंच मन जिंकलं आहे. केवळ मराठी नाही तर हिंदी प्रेक्षकांमध्येही त्याची कमालीची क्रेझ आहे. सध्या शिवच्या करिअरचा ग्राफ उंचच उंच जात आहे. हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर शिवला अनेक ऑफर्स येऊ लागल्या आहेत. सोशल मीडियावर त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेमही मिळत आहे. शिव ठाकरेने 'बिग बॉस १६'ची ट्रॉफी जिंकली नसली तरी 'बिग बॉस' सोडल्यानंतर त्याला लॉटरी लागली आहे. बिग बॉसनंतर शिव 'खतरों के खिलाडी १३'मध्ये दिसतोय. पण आता लवकर तो आणखी एक रिअॅलिटी शोमध्ये दिसणार असल्याची माहिती आहे. 
 
शिव ठाकरे रोडीज रायझिंगमध्ये दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिव ठाकरे लवकरच सोनू सूद, रिया चक्रवर्ती, प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटी यांच्यासह रोडीज कर्मा या कांडमध्ये सामील होणार आहेत.

त्याचं झालं असं की रोडीजच्या सेटवरील एक फोटो लीक झाला असून याआधी ट्रेलरदरम्यान शिवाची झलकही दाखवण्यात आली होती. पहिल्या प्रोमोमध्ये, शिवासारखा शरीरयष्टी असलेला एक स्पर्धक मास्क घालून ऑडिशन राउंडमध्ये प्रवेश करताना दाखवण्यात आला होता. त्याचा आवाज शिवशी मिळता जुळता होता. पण आता असे कळतंय की तो दुसरा तिसरा कोणी नसून 'बिग बॉस मराठी 2' चा विजेता शिव ठाकरेच होता.

Web Title: Shiv thakare to appear in sonu sood prince narula rhea chakraborty roadies karm yakaand after khatron ke khiladi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.