'अमरावतीचा वाघ' शिव ठाकरेचा बिग बॉस ६ मधील 'या' स्पर्धकाला जाहीर पाठिंबा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 08:58 IST2026-01-16T08:57:44+5:302026-01-16T08:58:43+5:30

'बिग बॉस मराठी'चा दुसरा विजेता शिव ठाकरे सहाव्या पर्वात कोणाला पाठिंबा देतोय?

shiv thakare supports roshan bhajankar in bigg boss marathi 6 says bhau ahe aapla | 'अमरावतीचा वाघ' शिव ठाकरेचा बिग बॉस ६ मधील 'या' स्पर्धकाला जाहीर पाठिंबा, म्हणाला...

'अमरावतीचा वाघ' शिव ठाकरेचा बिग बॉस ६ मधील 'या' स्पर्धकाला जाहीर पाठिंबा, म्हणाला...

'बिग बॉस मराठी ६'चा पहिला आठवडा सुरु आहे. रील स्टार, कलाकार, गायक, इन्फ्लुएन्सर्स अशी अनेक मंडळी सहभागी झाली आहेत. पहिल्या दिवसापासूनच घरात भांडणांनीही जोर धरलाय. तन्वी कोलते, रुचिता जामदार भांडणांमध्ये आघाडीवर पाहयला मिळतायेत. बिग बॉस मराठीचा माजी विजेता शिव ठाकरेने त्याचा आवडता स्पर्धक कोण याचा खुलासा केला आहे.

अमरावतीचा वाघ अशी ओळख असलेला शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता आहे. शिवने संपूर्ण सीझन उत्तम खेळ आणि माणुसकीने जिंकला होता. आपल्या स्वभावामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला. दरम्यान यंदाच्या सीझनमध्येही एक अमरावतीचा स्पर्धक आहे तो म्हणजे रोशन भजनकर. रोशन अमरावतीचा बॉडी बिल्डर आहे. त्याचं आयुष्य खूप खडतर परिस्थितीत गेलं. आजही तो हमाली करतो. शिव ठाकरेने इन्स्टाग्रामवर रोशनला टॅग करत पाठिंबा दिला आहे. 'भाऊ आहे आपला' असं त्याने कॅप्शन दिलं आहे. 

या आठवड्यात रोशन भजनकर नॉमिनेट झाला आहे. सोनाली राऊतने त्याला टास्कमध्ये नॉमिनेट केलं आहे. रोशन अजून घरातील इतर स्पर्धकांसोबत मिसळला नसल्याचं कारण तिने दिलं. याशिवाय सागर कारंडे, दिव्या शिंदे, अनुश्री माने, प्रभू शेळके, राधा मुंबईकर, रोशन भजनकर, करण सोनावणे, दीपाली सय्यद आणि रुचिता हे सदस्यही नॉमिनेट झाले आहेत. याचा अर्थ एकूण ९ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे.

Web Title : शिव ठाकरे ने 'बिग बॉस 6' में अमरावती के रोशन भजनकर का समर्थन किया।

Web Summary : 'बिग बॉस मराठी 6' में शिव ठाकरे ने अमरावती के रोशन भजनकर को समर्थन दिया। पूर्व विजेता ने इंस्टाग्राम पर रोशन को 'परिवार' बताते हुए समर्थन व्यक्त किया। रोशन पहले सप्ताह में आठ अन्य प्रतियोगियों के साथ नामांकन का सामना कर रहे हैं।

Web Title : Shiv Thakare supports Roshan Bhajankar from Amravati in Bigg Boss 6.

Web Summary : Bigg Boss Marathi 6 sees Shiv Thakare backing Amravati's Roshan Bhajankar. The former winner expressed support on Instagram, calling Roshan 'family'. Roshan faces nomination in the first week alongside eight other contestants.