Video : ८१ वर्षीय आजीला शिव ठाकरेने दिलं खास सरप्राइज, वाढदिवसाचं केलं जंगी सेलिब्रेशन, म्हणाला, "थरथरणाऱ्या हाताची..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 12:38 PM2023-10-19T12:38:50+5:302023-10-19T12:40:27+5:30

शिव ठाकरेने साजरा केला आजीचा ८१वा वाढदिवस, सोशल मीडियावरुन होतोय कौतुकाचा वर्षाव

shiv thakare celebrates grandmother 81st birthday shared video netizens reacts | Video : ८१ वर्षीय आजीला शिव ठाकरेने दिलं खास सरप्राइज, वाढदिवसाचं केलं जंगी सेलिब्रेशन, म्हणाला, "थरथरणाऱ्या हाताची..."

Video : ८१ वर्षीय आजीला शिव ठाकरेने दिलं खास सरप्राइज, वाढदिवसाचं केलं जंगी सेलिब्रेशन, म्हणाला, "थरथरणाऱ्या हाताची..."

मराठमोळा शिव ठाकरे कायमच चर्चेत असतो. रिएलिटी शोमधून प्रसिद्धी मिळवलेल्या शिवने त्याच्या साध्या आणि सरळ स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. शिव ठाकरेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. रिएलिटी शोमध्ये असो किंवा वैयक्तिक आयुष्यात शिववर त्याच्या वागणुकीमुळे कौतुकाचा वर्षाव होत असतो. सध्या शिवच्या अशाच एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

शिवने त्याच्या ८१ वर्षीय आजीचा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा केला आहे. शिवने त्याच्या आजीला वाढदिवसादिवशी खास सरप्राइज दिलं. लाडक्या आजीच्या ८१व्या बर्थडेचं शिवने जंगी सेलिब्रेशन केलं. शिव व त्याच्या कुटुंबीयांकडून त्याच्या आजीचा ८१व्या वाढदिवसासाठी हॉलमध्ये खास तयारी करण्यात आली होती. ८१ दिव्यांची आजीला ओवाळून केक कापून वाढदिवस साजरा केला गेला. हे पाहून शिवची आजीही भावुक झालेल्या पाहायला  मिळाल्या. 

आजीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ शिवने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने "आमची आजी, थरथरणाऱ्या हाताची आभाळाएवढी माया...हॅपी बर्थडे माझी आजी", असं कॅप्शन दिलं आहे. शिवच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही शिवच्या या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. 

'एमटीव्ही रोडीज'मधून लोकप्रियता मिळवलेल्या शिवने 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात सहभाग घेतला होता. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. त्यानंतर  'बिग बॉस १६'मध्येही शिव सहभागी झाला होता. 'बिग बॉस'नंतर 'खतरों के खिलाडी १३'मध्ये शिवने टॉप ५ फायनलिस्टमध्ये जागा मिळवली होती. आता 'झलक दिखला जा'मध्ये शिव सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. 
 

Web Title: shiv thakare celebrates grandmother 81st birthday shared video netizens reacts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.