शिल्पा शिंदेने रिक्षामध्ये, तर बंदगी कालराने शाळेच्या बिल्डिंगमागे केला होता पहिला किस !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 21:53 IST2017-11-10T16:23:59+5:302017-11-10T21:53:59+5:30

बिग बॉसच्या घरात जवळपास १५० कॅमेरे बसविण्यात आलेले असून, घरातील प्रत्येक सदस्यावर या कॅमेºयांची नजर असते. सदस्यांमधील वाद-विवादासह त्यांचे ...

Shilpa Shinde was in the rickshaw, while the bandi Kaler had made the school building behind the first kiss! | शिल्पा शिंदेने रिक्षामध्ये, तर बंदगी कालराने शाळेच्या बिल्डिंगमागे केला होता पहिला किस !

शिल्पा शिंदेने रिक्षामध्ये, तर बंदगी कालराने शाळेच्या बिल्डिंगमागे केला होता पहिला किस !

ग बॉसच्या घरात जवळपास १५० कॅमेरे बसविण्यात आलेले असून, घरातील प्रत्येक सदस्यावर या कॅमेºयांची नजर असते. सदस्यांमधील वाद-विवादासह त्यांचे रोमॅण्टिक क्षण बिग बॉसच्या कॅमेºयात कैद केले जातात. सध्या घरात शिल्पा, आकाश, अर्शी, पुनीश आणि बंदगीचा एक गट तयार झाला आहे. हे पाच स्पर्धक घरात टाइमपास करण्यासाठी आपल्या जमान्यातील गोष्टी आपापसात शेअर करतात. त्यासाठी ‘मेरा पहला प्यार’ हा टॉपिक ठेवतात. यादरम्यान हे पाचही सदस्य त्यांनी पहिला किस केव्हा घेतला हे एकमेकांना सांगतात. पुनीश यादरम्यान सांगतो की, ‘मी ज्या मुलीला बघत होतो, त्यावरून मला असे वाटत होते की, ती मला केव्हाच पटणार नाही. माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडसोबतही असेच काहीसे झाले होते, त्यानंतर ती माझ्या प्रेमात पडली. दोन अडीच वर्षं रिलेशनशिपमध्ये होतो. त्यानंतर मला दुसरीच पसंत आली. मग मी तिला सोडून दिले अन् तिसरीच्या मागे लागलो. ती खूप स्वीट होती’, असा खुलासा पुनीश करतो. 



पुढे शिल्पादेखील तिच्या पहिल्या प्रेमाचा किस्सा सांगते. ती म्हणतेय की, ‘पहिल्यांदा मी आॅटोरिक्षामध्ये किस केला. दहावीत असताना मी पहिल्यांदा रिलेशनशिपमध्ये अडकले होते. त्याचबरोबर ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडचाही एक किस्सा शेअर करते. शिल्पा सांगते की, ‘आम्ही रिक्षात बसलो होतो. तेव्हा तो मला म्हणाला की, माझ्या मित्रांनी पैज लावली की, तू मला किस देणार नाहीस. तेव्हा मी म्हटले, एवढंच ना... जा त्यांना सांग की, मी तुला किस दिला. माझे हे शब्द ऐकून तो खूप खूश झाला. परंतु मी लगेचच बोलली की, मी किस दिला की नाही दिला हे बघण्यासाठी ते येणार आहेत काय? सांगायला काय जाते. हे शब्द ऐकताच त्याच्या चेहरा जणू काही कोमेजून गेला.’ 



त्यानंतर बंदगी सांगते की, ‘मी पहिल्यांदा शाळेतील लाल रंगाच्या भिंतीमागे किस केला होता. तेव्हा मला असे वाटले की, हे मी काय केले?’ बंदगी बोलत असतानाच पुनीश म्हणतो की, कॉलेजमध्ये असताना माझ्या दोन गर्लफ्रेंड्स होत्या. एकदा मला दोघींचा सामना करावा लागला. दोघीही सकाळी-सकाळीच कॉलेजमध्ये आल्या होत्या. दोघी एकत्र येतील याचा मी विचार केला नव्हता. त्यानंतर दोघींनीही माझी धुलाई केली. त्यानंतर मी माझी गाडी घेऊन तेथून पळून गेलो.

Web Title: Shilpa Shinde was in the rickshaw, while the bandi Kaler had made the school building behind the first kiss!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.