n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">जाना ना दिल से दूर या मालिकेत शिल्पा तुळसकर आणि शिवानी सुर्वे एकत्र काम करत आहेत. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान त्या दोघी एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या आहे. त्या सेटवर दुपारचे जेवण एकत्रच जेवतात. तसेच सेटवर अधिकाधिक वेळ एकमेकांसोबतच घालवतात. इतकेच नाही तर चित्रीकरण नसल्यासही त्या एकमेकींना भेटतात आणि फिरायला जातात. याविषयी शिवानी सांगते, "शॉपिंग करायला मला खूप आवडते. शॉपिंग केल्याने तुमचा मानसिक ताण कमी होतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे शिल्पा आणि मी नुकतीच खूप सारी शॉपिंग केली. या मालिकेमुळे मला शिल्पासारखी एक खूप चांगली मैत्रीण मिळाली आहे."
Web Title: Shilpa and Shivani left the last shopping
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.