'रात्रीस खेळ चाले ३'मधील शेवंता लवकरच या दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ, हळदीचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 02:20 PM2022-12-14T14:20:08+5:302022-12-14T14:20:32+5:30

Krutika Tulaskar : बाळूमामाच्या नावाने चांगभलं मालिकेतील बाळूमामांची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेदेखील आज विवाहबंधनात अडकला आहे. त्यानंतर आता अभिनेत्री कृतिका तुळसकर लग्नबेडीत अडकणार आहे.

Shevanta from 'Ratris Khel Chale 3' will soon tie the knot with the director, pictures of Haldi have surfaced. | 'रात्रीस खेळ चाले ३'मधील शेवंता लवकरच या दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ, हळदीचे फोटो आले समोर

'रात्रीस खेळ चाले ३'मधील शेवंता लवकरच या दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ, हळदीचे फोटो आले समोर

googlenewsNext

सध्या मराठी टेलिव्हिजनवर लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अक्षया देवधर-हार्दीक जोशी, आशय कुलकर्णी-सानिया गोडबोलेनंतर आज बाळूमामाच्या नावाने चांगभलं मालिकेतील बाळूमामांची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेदेखील आज विवाहबंधनात अडकला आहे. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री लग्नबेडीत अडकणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे रात्रीस खेळ चाले ३ फेम शेवंता म्हणजेच कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar). ती मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत लग्नबेडीत अडकणार आहे.

कृतिका तुळसकर मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल देवरुखकरसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. त्यांचा काल हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ते कधी लग्नगाठ बांधणार आहेत, हे अद्याप समजू शकलेलं नाही.  

रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत शेवंताच्या भूमिकेतून कृतिका तुळसकर घराघरात पोहचली. गेली १८ वर्षे ती रंगभूमीवर कार्यरत असून , तिनं अनेक नाटत आणि चित्रपटांत काम केलं आहे. ती कथ्थक विशारदही आहे. विशेष म्हणजे ती मानसोपचारतज्ञ म्हणूनही काम करते आहे.


तर विशाल देवरुखकरने बॉईज चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यानंतर बॉईज २ आणि बॉईज ३चेही दिग्दर्शन केले आहे. गर्ल्स या चित्रपटाचाही तोच दिग्दर्शक आहे. 

Web Title: Shevanta from 'Ratris Khel Chale 3' will soon tie the knot with the director, pictures of Haldi have surfaced.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.