शहनाझ गिलचा भाऊ शेहबाजची गर्लफ्रेंड कोण? फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:37 IST2025-11-07T15:37:33+5:302025-11-07T15:37:52+5:30
शहनाझ गिलचा भाऊ शेहबाजची गर्लफ्रेंड चर्चेत आली असून तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

शहनाझ गिलचा भाऊ शेहबाजची गर्लफ्रेंड कोण? फोटो झाले व्हायरल
'बिग बॉस १९'मध्ये सध्या जोरदार ड्रामा आणि भरपूर मनोरंजन सुरू आहे. शोला दोन महिने पूर्ण झाले असून घरातील वाद आणि भांडणे वाढत आहेत. दरम्यान, अनेक स्पर्धक आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलत आहेत. या सगळ्यामध्ये चर्चेत आहे तो म्हणजे शहनाझ गिलचा भाऊ शेहबाज बदेशा. वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून घरात आल्यापासून शेहबाज हा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. आता त्यानं गर्लफ्रेंडबद्दल खुलासा केलाय.
बिग बॉसच्या घरात स्पर्धकांशी बोलताना शेहबाजने आपल्या गर्लफ्रेंडचे नाव कशिश अग्रवाल असल्याचे सांगितले. यानंतर लगेचच नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर शोधलं. कशिश अग्रवाल ही एक एन्फ्लुएन्सर आहे. कशिशला सध्या इंस्टाग्रामवर ८,००० हून अधिक लोक फॉलो करतात. तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये तिने "हर हर महादेव" आणि "प्राऊड व्हेजिटेरियन" असे लिहिले आहे.
शेहबाज 'बिग बॉस १९' मध्ये प्रवेश करणार होता, तेव्हा कशिशने शेहबाजसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. फोटोच्या कॅप्शनमध्ये कशिशने लिहिले होते की, "मी ऐकले आहे की बिग बॉसमध्ये गेल्यावर लोक बदलतात, पण मला माहित आहे की तू स्वतःला जसा आहेस, तसाच दाखवशील. जग तुझं सत्य आणि चारित्र्य पाहून नक्कीच प्रभावित होईल. मला तुझी खूप आठवण येते, ट्रॉफी घेऊन परत ये".