Shefali Jariwala Death: शेफालीनं मृत्यूआधी शेवटच्या क्षणी काय केलं? पोलिस तपासात धक्कादायक बाबी समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 10:18 IST2025-07-02T10:18:40+5:302025-07-02T10:18:54+5:30

शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक बाबी समोर, वाचा सविस्तर

Shefali Jariwala Death Investigation Updates Death Reason For Satyanarayan Puja Fasting Took Vitamin C Drip Medicines | Shefali Jariwala Death: शेफालीनं मृत्यूआधी शेवटच्या क्षणी काय केलं? पोलिस तपासात धक्कादायक बाबी समोर

Shefali Jariwala Death: शेफालीनं मृत्यूआधी शेवटच्या क्षणी काय केलं? पोलिस तपासात धक्कादायक बाबी समोर

Shefali Jariwala Death: अभिनेत्री शेफाली जरीवालाचा शुक्रवारी(२७ जून) मृत्यू झाला. ती फक्त ४२ वर्षांची होती. शेफालीच्या अचानक झालेल्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूनंतर अंबोली पोलिसांची टीम तपास करत आहेत. पोलिस तपास आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनी शेफाली जरीवालाने तिच्या मृत्यूपूर्वीचे शेवटचे क्षण कसे घालवले याची संपूर्ण माहिती दिली. शेफालीने तिच्या शेवटच्या क्षणी काय केले ते जाणून घेऊया.

शेफाली जरीवालाने २७ जून २०२५ रोजी तिच्या मुंबईतील घरी सत्यनारायण पूजा आयोजित केली होती, ज्यासाठी तिने उपवासही केला होता. उपवास असूनही, शेफालीने  अँटी-एजिंग औषधे घेतली. ती गेल्या काही वर्षांपासून अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत होती.  शेफालीचा पती पराग त्यागीच्या जबाबानुसार, दिवसभर उपवास केल्यानंतर, शेफालीने फ्रीजमधील शिळे अन्न खाल्ले, त्यानंतर ती रात्री १०:३० च्या सुमारास अचानक बेशुद्ध पडली.

त्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेली शेफालीची जवळची मैत्रीण पूजा घई हिने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, पराग खाली जाताच, मोलकरणीने ताबडतोब त्याला फोन केला की दीदीची तब्येत ठीक नाही, त्यानंतर शेफालीला पराग अंधेरी पश्चिमेतील बेलेव्ह्यू रुग्णालयात घेऊन गेला, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तेथील डॉक्टरांनी तिच्या कुटुंबाला शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.अंबोली पोलिसांना रात्री ११:३० च्या सुमारास घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर एक पथक ११:४५ पर्यंत शेफालीच्या घरी पोहोचले आणि दुसरी पथक चौकशीसाठी कूपर रुग्णालयात पोहोचले.

२८ जून २०२५ रोजीचा घटनाक्रम:

 कूपर रुग्णालयाच्या सरकारी वैद्यकीय पथकाने प्रोटोकॉलनुसार संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून मृतदेहाचे शवविच्छेदन केलं. पाच डॉक्टरांच्या पथकाने मिळून अभिनेत्रीचा शवविच्छेदन अहवाल तयार केला. मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी व्हिसेरा (शरीराचे अवयव) नंतर कलिना मुंबई येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. अन्न विषबाधा आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेतल्याने हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्रीचा मृत्यू झाला असावा, असा मुंबई पोलिसांना संशय आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्रीने उपवास केल्यानंतर शिळा भात खाल्ला आणि वृद्धत्वविरोधी इंजेक्शन्स घेतली. 

शेफालीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्यासाठी २ ते ३ दिवस लागले तर, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून तिचा रिपोर्ट ५० ते ९० दिवसांत येईल अशी अपेक्षा आहे. शेफाली जरीवालाच्या मृत्यू प्रकरणात, पोलिसांनी आतापर्यंत तिच्या कुटुंबातील १४ सदस्यांचे जबाब नोंदवले आहेत, ज्यात तिचा पती पराग त्यागी, कुटुंबातील सदस्य, घरातील नोकर आणि जवळचे मित्र यांचा समावेश आहे.
 

Web Title: Shefali Jariwala Death Investigation Updates Death Reason For Satyanarayan Puja Fasting Took Vitamin C Drip Medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.