शशांक केतकरची बाइक राइड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 15:46 IST2016-03-27T22:46:18+5:302016-03-27T15:46:18+5:30
बॉलीवुडमध्ये सलमान खान, जॉन अब्राहम, अक्षय कुमार, रणधीर कपूर यांसारख्या सुपरस्टार कलाकारांच्या बाइक राइडची चर्चा जगजाहीरच आहे. आता, याच ...

शशांक केतकरची बाइक राइड
ब लीवुडमध्ये सलमान खान, जॉन अब्राहम, अक्षय कुमार, रणधीर कपूर यांसारख्या सुपरस्टार कलाकारांच्या बाइक राइडची चर्चा जगजाहीरच आहे. आता, याच बाइक राइडच्या प्रेमात मराठी कलाकारदेखील पडलेले दिसतात. होणार सुन मी या घरची या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणारा शशांक केतकर या अभिनेत्यादेखील आपले बाइक प्रेम सोशलमिडीयावर शेअर केले आहे. शशांकने रॉयल एनफील्ड या बाइकची जबरदस्त राइड घेतलेली दिसते. या बाइकवरचा त्याची लूक देखील एकदम हटके दिसत आहे. व्हाइट शर्ट, जीन्स, गॉगल, शुजमध्ये शशांक एकदम झक्कास दिसत आहे.
![]()