"ज्या शाळेत मतदान केलं त्याबाहेरच ही अवस्था...", शशांक केतकरने दाखवली परिस्थिती, व्यक्त केला राग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 09:58 IST2026-01-15T09:57:08+5:302026-01-15T09:58:00+5:30
शशांक केतकरने ठाणे येथे मतदानाचा हक्क बजावला. मात्र केंद्राबाहेरची परिस्थिती पाहून त्याने राग व्यक्त केला

"ज्या शाळेत मतदान केलं त्याबाहेरच ही अवस्था...", शशांक केतकरने दाखवली परिस्थिती, व्यक्त केला राग
मराठी अभिनेताशशांक केतकर कायम नागरिकांचे प्रश्न बेधडकपणे मांडत असतो. रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी, जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य, अनधिकृत बॅनर्स अशा अनेक तक्रारी त्याने वेळोवेळी सोशल मीडियावर मांडल्या आहेत. आज राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान होत आहे. शशांकनेही मतदान केलं. त्याने ज्या शाळेत मतदान केलं त्याच्यासमोरच कचऱ्याचं साम्राज्य असल्याचं चित्र होतं. यावरुन त्याने व्हिडीओ शेअर करत राग व्यक्त केला.
शशांक केतकरने ठाणे येथे मतदानाचा हक्क बजावला. बोटावरची शाई दाखवत तो म्हणाला, 'ज्या शाळेत मतदान केलंय त्या शाळेच्या बाहेरच ही अवस्था आहे'. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'उद्या कोणत्याही पार्टीतला कोणीही निवडून आला तरी 'स्वच्छता' या साध्या गोष्टीसाठी कोणीही पुढाकार घेणार नाही आणि नागरिक सुद्धा स्वच्छतेकडे लक्ष देणार नाहीत याची खात्री आहे. ही माझ्या मनातील उदासीनता नाहीये...वस्तुस्थिती आहे. ठाण्यातली ही इंटरनॅशनल शाळा आहे. त्या शाळेच्या दारात ही अवस्था आहे.घाण, प्रदूषण, फसवणूक... हे चालणार नाही. आदर हवा'.
'सगळी बोलाचीच कढी बोलाचाच भात.. कितीही कचरा होऊ द्या, आम्हांला काय? आम्ही फक्त सत्ता चालवणार.. नागरिकांचं म्हणायचं तर स्टेटस महत्वाचं बाकी कचरा करणं हा हक्क असल्यासारखे वागतात. अगदी बरोबर बोललात तुम्ही.','एक नागरिक म्हणून माझं शहर स्वच्छ रहावे ही माझी जबाबदारी आहे. जी गोष्ट इतर देशात लहान मुलांना पण कळते ती दुर्दैवाने आपल्याला मोठ्यांना पण लक्षात आणून द्यावी लागते. अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.